कॅप्टन धोनी नामुष्कीचा रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर

‘भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार’ असं बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक कौतुकास्पद रेकॉर्ड असले तरी, सध्या त्याची वाटचाल एका नामुष्कीजनक रेकॉर्डकडे सुरू आहे. 

PTI | Updated: Aug 11, 2014, 12:21 PM IST
कॅप्टन धोनी नामुष्कीचा रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर title=

नवी दिल्ली : ‘भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार’ असं बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक कौतुकास्पद रेकॉर्ड असले तरी, सध्या त्याची वाटचाल एका नामुष्कीजनक रेकॉर्डकडे सुरू आहे. 

परदेशांमध्ये टेस्ट क्रिकेट खेळताना त्याच्या नेतृत्वाचा ‘मिडास टच’ बहुतेक वेळा दिसलाच नाही. यामुळं परदेशात झालेल्या टेस्ट सामन्यांतील सर्वाधिक अपयशी कॅप्टन बनण्याच्या रेकॉर्डकडे त्याची वाटचाल सध्या सुरू आहे. या यादीत न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग आणि विंडीजचा ब्रायन लारा हे माजी कर्णधार संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. या दोघांनी प्रत्येकी १६ कसोटी सामने गमावले आहेत.

यजमान इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ नुकताच मॅँचेस्टर टेस्टमध्ये नामुष्कीजनक पद्धतीनं पराभूत झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताचा परदेशातील हा १३ वा पराभव ठरला. भारतीय कर्णधारांच्या विदेशातील कामगिरीचा विचार करता, धोनीची कामगिरी सर्वाधिक सुमार ठरते. परदेशात सर्वाधिक अपयशी ठरलेल्या कर्णधारांच्या यादीत श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ यांच्या बरोबरीनं धोनी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

धोनीच्या नेतृत्वात विदेशामध्ये भारत आतापर्यंत २७ टेस्ट खेळल्या आहेत. यात ६ टेस्टमध्ये विजय, तर १३ सामन्यांत पराभव पदरी आला. उर्वरित ८ मॅचेस अनिर्णीत सुटल्या.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.