अपहरणानंतर तरुणीवर गँगरेप, अश्लिल क्लिप बनवली

 उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील परीक्षितगड क्षेत्रातील एक गावातील दोन युवकांनी एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर कथित तीन दिवस गँगरेप केला आणि अश्लिल क्लिप बनवली. पोलिसांनी तरुणीचा शोध लावून एका आरोपीला अटक केली आहे.

PTI | Updated: Aug 9, 2014, 02:12 PM IST
अपहरणानंतर तरुणीवर गँगरेप, अश्लिल क्लिप बनवली title=

मेरठ :  उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील परीक्षितगड क्षेत्रातील एक गावातील दोन युवकांनी एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर कथित तीन दिवस गँगरेप केला आणि अश्लिल क्लिप बनवली. पोलिसांनी तरुणीचा शोध लावून एका आरोपीला अटक केली आहे.

या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार परीक्षितगड पोलिसांनी सांगितले, की परीक्षितगड येथील एका १८ वर्षाची तरूणी बुधवारी आपल्या छोट्या भावासह जंगलातून जात होती. त्यावेळी मागून मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन तरुणांननी तिचे अपहरण केले. आरोपींनी तिला लोहियानगर येथील एका रिकाम्या घरात नेले. या ठिकाणी तिला ३ दिवस बंधक बनवले आणि गँगरेप केला. मोबाइलवर अश्लिल व्हिडिओही तयार केला. या दरम्यान संधी मिळाल्यावर तरूणीने एका आरोपीच्या मोबाईलवरून कुटुंबियांना फोन करून घडलेला प्रकार सांगितले.  

कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तरुणीचा शोध लावला आणि मेडिकल परीक्षणासाठी रुग्णालयात पाठविले.

पोलिसांनी एक आरोपी साजिदला अटक केली आणि तुरूंगात रवानगी केली. दुसरा आरोपी जुबैरचा शोध सुरू आहे. ज्या ठिकाणी तरुणीला बंधक ठेवण्यात आले होते आणि अश्लिल क्लिप तयार केली ते घर जुबैरचे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.