फेसबुक, ट्विटर, गूगलप्लसनंतर पंतप्रधान मोदी आता 'इंस्टाग्राम' वर

सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच माहितीय. आज पंतप्रधान इंस्टाग्रामवर आले आहेत. आसियान आणि पूर्व आशियाई शिखर संमेलनाच्या समारंभातील एक फोटो मोदींनी इंस्टाग्रामवर शेअर केला. 

PTI | Updated: Nov 12, 2014, 06:53 PM IST
फेसबुक, ट्विटर, गूगलप्लसनंतर पंतप्रधान मोदी आता 'इंस्टाग्राम' वर title=

ने पयी ताव: सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच माहितीय. आज पंतप्रधान इंस्टाग्रामवर आले आहेत. आसियान आणि पूर्व आशियाई शिखर संमेलनाच्या समारंभातील एक फोटो मोदींनी इंस्टाग्रामवर शेअर केला. 

मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेला संदेश आहे, "नमस्कार मित्रांनो, इंस्टाग्रामवर येणं चांगलं वाटतंय. माझा पहिला फोटो हा ने पयी तावमधील आशियान शिखर संमेलनातील आहे." पंतप्रधानांनी जो फोटो घेतलाय तो 25व्या आशियान शिखर संमेलनाच्या विशाल बिलबोर्डचा आहे. ज्यात म्यांमार आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात या बिलबोर्डपर्यंत पसरलेला सोनेरी कालीनही दिसतोय. 

इंस्टाग्रामवर मोदींनी पहिला फोटो टाकताच थोड्याच वेळात पंतप्रधानांना जवळपास 38,000 फॉलोअर्सनी फॉलो केलं. एका फॉलोअरनं कमेंट केली शिखर संमेलन आणि इंस्टाग्राममध्ये आपलं स्वागत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.