काळवीट शिकारप्रकरणी सल्लूला दिलासा

अभिनेता सलमान खानला दिलेल्या शिक्षेला स्थगिती देणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.  त्यामुळे सल्लूला दिलासा मिळालाय 

PTI | Updated: Nov 6, 2014, 10:39 AM IST
काळवीट शिकारप्रकरणी सल्लूला दिलासा title=

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानला दिलेल्या शिक्षेला स्थगिती देणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.  त्यामुळे सल्लूला दिलासा मिळालाय 

सल्लूने १९९८ मध्ये काळवीट शिकार केली होती. याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. दरम्यान, सलमान खानला परदेशात शूटिंगसाठी जाता यावे, यासाठी उच्च न्यायालयाने सल्लूच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. मुखोपाध्याय यांनी स्थगिती आदेशासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केले आहेत. खटल्याचे महत्त्व लक्षात न घेता केवळ परदेशात जाता येत नाही म्हणून शिक्षेच्या आदेशाला स्थगिती कशी दिली जाऊ शकते? 

१९९८ मध्ये हम साथ साथ है! चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांच्यावर काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.