बाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या सिमरन केणी या दहावीतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इथल्या महावीर टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका तरूणीचाही शोध पोलीस घेत आहेत.

PTI | Updated: Nov 23, 2014, 05:38 PM IST
बाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या title=

मुंबई: डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या सिमरन केणी या दहावीतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इथल्या महावीर टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका तरूणीचाही शोध पोलीस घेत आहेत.

सिमरन हिनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज मुलुंड पोलीस वर्तवित आहेत. मात्र हत्येच्या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करीत असल्याचं समजतं. मुलुंड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी आणि तपास सुरू केला आहे. तपासाची सुरुवात इमारतीच्या सुरक्षारक्षकांपासून झाल्याचं समजतं. ही विद्यार्थिनी या इमारतीत राहणारी नव्हती. मग ती आत गेलीच कशी, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकांचे जबाब नोंदविले जात आहेत.

पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल रंगाचं टी-शर्ट आणि काळी जीन्स परिधान केली होती. ती या इमारतीत राहत नव्हती, त्यामुळं तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना बरीच धावपळ करावी लागली. या घटनेच्या तपासासाठी सर्व पोलीस ठाण्यांना माहिती पुरविण्यात आली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू’ या वाक्यापुढं एका तरुणाचं नाव लिहिलेलं होतं. त्यावर पुसटसा मोबाइल नंबरही दिसत होता. मात्र या नंबरमध्ये फक्त आठच आकडे होते. तरुणाच्या नावाची सुरुवात एमवरून होतं. मात्र पुढील अक्षरं मिटल्यानं पोलिसांना फक्त एम अक्षर आढळलं. या अर्धवट माहितीच्या आधारावर शोध घेण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. अखेर रात्री उशिरा तिची ओळख पटली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.