मुंबई: मुलुंडमध्ये शनिवारी एका अल्पवयीन मुलीनं महावीर टॉवर या १२ मजली रहिवासी इमातीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या मुलीच्या आत्महत्येचं गुढ आता उकललं असून आरोपीच्या एकतर्फी प्रेमातून ही घटना झाल्याच समोर आलंय. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्याच शाळेत ११वी इयत्तेत शिकणारा साहिल वर्षभरापासून तिच्यामागे लागला होता. याबाबत वडिलांनीही साहिलला या मुलीला भेटू नको अशी ताकीद दिली होती. तरीही आरोपी भेटण्याबाबत तिच्यावर जबरदस्ती करत होता. भेटली नाहीस तर आत्महत्या करेल अशी धमकी देऊन जबरदस्तीनं तो तिला भेटत होता.
अशातच शाळेतील मित्र कमलेश आणि आरोपी मैत्रीणही त्याच्यासोबत फिरण्याबाबत दबाव आणत होते. याच छळवणुकीला कंटाळून तिनं आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास अजून सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.