नवी दिल्ली : केंद्र सरकारने विना-अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ४३.५० रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे आता गॅस थोडासा व्यस्त झाला आहे.
विना-अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या वर्षभरात पाचवेळा कपात झाली होती. या वर्षतील ही पहिलीच कपात आहे.
सरकारने १ जानेवारीपासून विना-अनुदानित सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना सबसिडी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडून घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
तसेच जेट विमानाच्या इंधनात १२.५ टक्के दरकपात करण्यात आली आहे. जागतिक बाजारात तेलाचे दर घसरल्यामुळे ही दरकपात करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.