वर्ल्डकप २०१५: मार्टिन क्रोची भविष्यवाणी न्यूझिलंड-दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल

महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच होण्याची भविष्यवाणी केलीय. 

PTI | Updated: Jan 7, 2015, 03:24 PM IST
वर्ल्डकप २०१५: मार्टिन क्रोची भविष्यवाणी न्यूझिलंड-दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल title=

वेलिंग्नट: महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच होण्याची भविष्यवाणी केलीय. 

क्रो यांनी सांगितलं की, कँसरमुळे त्यांना २०१४ हे वर्ष पूर्ण करतो की नाही अशी भीती वाटत होती. मात्र आता त्यांना वर्ल्डकप पाहण्याची इच्छा आहे. आपल्या भविष्यवाणी दरम्यान न्यूझिलंडचे सर्वा त महान बॅट्समन असलेल्या क्रो यांनी कँसरशी केलेल्या संघर्षाचीही माहिती दिली. क्रो जवळपास दोन वर्षांपूर्वी लिमफोकाच्या एका प्रकारातून बाहेर आले होते. मात्र मागील वर्ष आजार पुन्हा परतला. 

ऑकलँडच्या ईडन पार्कमध्ये पत्रकारांसोबत बोलतांना क्रो यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपचे प्रबल दावेदार आहेत. मात्र त्यांचं म्हणणं आहे की, न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिका आश्चर्यचकित करण्यात समर्थ आहे. क्रो यांनी सांगितलं, मी न्यूझिलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल निवडतो. मला वाटतंय दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या प्रदर्शनाची आशा वाटते. आम्ही एक दिवस हा खिताब नक्की जिंकणार आणि घरगुती मैदानावर आम्ही खूप चांगले आहोत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.