'प्रभू'पावले, राज्याला १४ हजार ८१७ कोटींची तरतूद

 रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राला पावलेत. प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये राज्याला १४ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एम.यु.टी.पी अंतर्गत ११ हजार ४४१ कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून राज्यातील रेल्‍वे विकासासाठी ३ हजार ३७६ कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.

PTI | Updated: Feb 27, 2015, 11:02 AM IST
'प्रभू'पावले, राज्याला १४ हजार ८१७ कोटींची तरतूद title=

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राला पावलेत. प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये राज्याला १४ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एम.यु.टी.पी अंतर्गत ११ हजार ४४१ कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून राज्यातील रेल्‍वे विकासासाठी ३ हजार ३७६ कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.

राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे अर्थसंकल्पात एम.यु.टी.पी अंतर्गत (Mumbai Urban Transport Project) सुमारे ११ हजार ४४१ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्ताववित केले आहेत. तर राज्यातील इतर रेल्वे प्रकल्प विकासासाठी ३ हजार ३७६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, चौपदरीकरण तसेच रेल्वे स्थानकांचा विकास, नवीन रेल्वे मार्ग आदी योजनांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

प्रस्तावित प्रकल्प 

- विरार-डहाणू मार्गाचे चौपदरीकर
एम.यु.टी.पी अंतर्गत विरार-डहाणू या पश्चिम रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी ३ हजार ५५५ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. ॉ

-पनवेल-कर्जत मार्गाचे दुपदरीकर

पनवेल-कर्जत या मध्य रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी ;२ हजार २४ कोटी, 

-ऐरोली-कळवा उन्नत मार्ग 

ऐरोली-कळवा या मध्य रेल्वेच्या उन्नत मार्गासाठी ४२८ कोटी, रेल्वे स्थानक विकासासाठी १  हजार ९५० कोटी मध्ये आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील फाटक नियंत्रणासाठी ५२० कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. 

- नवीन रेल्वे डबे खरेदी

नवीन रेल्वे डबे खरेदीसाठी २ हजार ८९९ कोटी व तांत्रिक सहाय्यासाठी ६५ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित ४५आहेत. एकूण ११ हजार ४४१ ;कोटी रुपयांच्या या तरतूदी व राज्य सरकारचा वाटा हा १ हजार ७१७ कोटी रुपयांचा असणार आहे.

- जागतिक बॅकेचे कर्ज
जागतिक बॅकेचे कर्ज हे ८ हजार ६ कोटी रुपये, रेल्वे मंत्रालयाचा वाटा हा १ हजार ७१७ कोटी रुपयांचा असणार आहे .

दुहेरीकरण प्रकल्प

- पुणे - लोणावळादरम्यान तिसरी लाइन (अंतर ६४ किमी आणि अंदाजित खर्च ८०० कोटी रुपये). तरतूद १८ कोटी ३० लाख 

- पुणे- मिरज-लोंढा (अंतर ४६७ किमी) दुहेरीकरण. अंदाजित खर्च ४,६७० कोटी रुपये. तरतूद ३९९ कोटी रुपये

- वर्धा- बल्लारशहादरम्यान तिसरी लाइन. (अंतर १३२ किमी आणि खर्च ६३० कोटी रुपये)

- कोरापुट - सिंगापूर (अंतर १६४ किमी आणि खर्च १६४० कोटी रुपये) 

- काझीपेठ- बल्लारशहादरम्यान तिसरी लाइन (अंतर २०२ किमी आणि खर्च २०२० कोटी रुपये)

- नागपूर- राजनांदगावदरम्यान तिसरी लाइन (अंतर २२८ किमी आणि खर्च १२३७ कोटी रुपये)

- नव्या मार्गांचा सर्व्हे

- पुणे- नाशिक (अंतर २६५ किमी आणि तरतूद १ कोटी ३ लाख रुपये)

- मनमाड- इंदूर व्हाया मालेगाव आणि धुळे (अंतर ३३९ किमी आणि तरतूद १ कोटी ३२ लाख रुपये)

- रोटेगाव- पुणतांबा (अंतर २७ किमी आणि तरतूद ४ लाख)

- उमरपाडा- नंदूरबार (अंतर ११० किमी आणि तरतूद १७लाख)

- रामटेक- तुमसर (अंतर ५० किमी आणि तरतूद ८ लाख)

- दुहेरीकरणासाठी सर्व्हे

- इगतपुरी- भुसावळ तिसरी लाइन (अंतर ३०८ किमी आणि तरतूद ३ कोटी ८ लाख रुपये) 

राज्याचा वाट्याला आलेली तरतूद

१४७४ कोटी रुपये (मागील वर्षाची तरतूद)

३३७६ कोटी रुपये (यंदाची तरतूद. तब्बल 130टक्क्यांची वाढ)

० मंजूर प्रकल्प
१ (मागील वर्षीची मंजुरी) ७ (यंदाचे मंजूर प्रकल्प)

- प्रवाशांची सुविधा

२७५.३६ कोटी रुपये (मागील वर्षीची तरतूद)

४४६.३५ कोटी (यंदाची तरतूद. वाढ ६२ टक्के)

- रेल्वे पुलांची संख्या

३ (मागील वर्षी मंजूर पूल) ८६ (यंदाचे मंजूर पूल)

- विद्युतीकरणाचे प्रकल्प

० (मागील वर्षी मंजूर केलेले) ५५२(यंदा मंजूर केलेले प्रकल्प)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

 झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.