वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला कायमस्वरुपी प्रतिनिधीत्वास पाठिंब्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शिक्कमोर्तब केले आहे.
नजिकच्या काळात सुरक्षा समितीमध्ये मोठे बदल अपेक्षित असल्याचं व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जोश एरनेस्ट यांनी म्हटलंय. हे बदल नेमके कधी होतील ते माहिती नाही, मात्र बदललेल्या सुरक्षा समितीत भारताच्या कायम प्रतिनिधीत्वाला राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा असल्याचं ते म्हणाले.
ओबामांनी संसदेमध्ये याबाबत भाष्य केलंय. भारत भेटीवर आले असतानाही त्यांनी याची हमी दिली होती. अमेरिकेच्या उघड पाठिंब्यामुळे UNSCमध्ये भारताची भूमिका अधिक व्यापक होण्यास मदत होणार आहे. असं झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचं ते मोठं यश मानलं जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.