हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालू - श्रीलंकन पंतप्रधान

भारतीय मच्छीमार श्रीलंकन सागरी हद्दीत दिसल्यास गोळी मारणार, असे धक्कादायक वक्यव्य श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केलेय. श्रीलंकेनं दिलेल्या इशाऱ्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली आहे.

PTI | Updated: Mar 7, 2015, 04:53 PM IST
हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालू - श्रीलंकन पंतप्रधान  title=

कोलंबो : भारतीय मच्छीमार श्रीलंकन सागरी हद्दीत दिसल्यास गोळी मारणार, असे धक्कादायक वक्यव्य श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केलेय. श्रीलंकेनं दिलेल्या इशाऱ्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली आहे.

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. श्रीलंकन सागरी हद्दीत भारतीय मच्छीमार दिसल्यास गोळी मारण्यात येईल, असा इशारा रानिल विक्रमसिंघे यांनी दिला आहे.  

श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छीमारांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान यासंदर्भात श्रीलंकन सरकराशी बोलणं सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सैय्यद अकबरुद्दीन यांनी दिलीये. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात श्रीलंकेच्या दौ-यावर जाणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.