ट्युनिशियात संग्रहालयावर दहशतवादी हल्ला, 22 ठार

दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानं टु्यनिशियाची राजधानी टु्यनिस शहर हादरलं. इथल्या प्रसिद्ध बार्डो वस्तुसंग्रहालयात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यात 17 विदेशी पर्यकांसह 22 जण ठार झाले. 

PTI | Updated: Mar 19, 2015, 12:05 PM IST
ट्युनिशियात संग्रहालयावर दहशतवादी हल्ला, 22 ठार title=

ट्युनिस: दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानं टु्यनिशियाची राजधानी टु्यनिस शहर हादरलं. इथल्या प्रसिद्ध बार्डो वस्तुसंग्रहालयात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यात 17 विदेशी पर्यकांसह 22 जण ठार झाले. 

संसदेनजीकच हे वस्तुसंग्रहालय आहे. हा हल्ला झाला तेव्हा संसदेत दहशतवादविरोधी विधेयकावर चर्चा चालू होती. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या टु्यनिशियातील हा अनेक वर्षांनंतरचा पहिला दहशतवादी हल्ला आहे.

ट्युनिशियाचे पंतप्रधान हबीबी इसीद यांनी सांगितलं की, मृतांमध्ये पोलंड, इटली, जर्मनी आणि स्पेनच्या पर्यटकांचा समावेश आहे. सुरक्षा दलानं दोन हल्लेखोरांचा खात्मा केला असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. वस्तुंसग्रहालयावर हल्ला चढविला तेव्हा आतमध्ये जवळपास शंभर पर्यटक होते. हल्लेखोरांनी काही पर्यटकांना ओलिस ठेवल्याचं वृत्त आहे. तथापि, या वृत्ताला गृहमंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद अली अरौई यांनी दुजोरा दिला नाही. तथापि, आत पर्यटक असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीबीसीच्या वृत्तानुसार ओलिस ठेवण्यात आलेल्यांत ब्रिटिश, इटली, फ्रेंच आणि स्पेनच्या नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्याची खबर थडकताच संसद भवन रिकामं करण्यात आलंय. दहशतवादविरोधी पथकं संग्रहालयात दाखल झाली असून, संसद परिसरासह या सर्व भागांची नाकेबंदी करण्यात आली आहे, असं गृहमंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद अली अरौई यांनी सांगितलं.

अत्यंत प्राचीन आणि दुर्मिळ अशा वस्तू या संग्रहालयात असल्यानं जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येनं वस्तुसंग्रहलय पाहण्यासाठी ट्युनिसला भेट देत असतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.