अबब! एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया

मध्य प्रदेशमधील कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत झालेला गोंधळ सर्वज्ञात असतांनाच एका तासात तब्बल २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार इलाहाबादमध्ये समोर आलाय. 

PTI | Updated: Mar 5, 2015, 08:15 PM IST
अबब! एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया title=

इलाहबाद: मध्य प्रदेशमधील कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत झालेला गोंधळ सर्वज्ञात असतांनाच एका तासात तब्बल २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार इलाहाबादमध्ये समोर आलाय. 

इलाहबादच्या चंदौली इथल्या एका प्रथमोपचार केंद्रावर सोयी सुविधांची कमतरता असताना या डॉक्टरनं ही शस्त्रक्रिया केलीय. या प्रथम उपचार केंद्रात रुग्णांना झोपण्याचीही व्यवस्था नसल्यानं त्यांना जमीनीवरच झोपवावं लागल्याचंही उघड झालं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

ही शस्त्रक्रिया करते वेळी आणखी एक डॉक्टर हजर असल्याचं सांगितलं जात आहे. पण, योग्य तपशील हातात लागल्यावर अधिक भाष्य करणं सोयीस्कर असल्याचं मुख्य वैद्यकीय अधिकारी आर. एन. सिंग यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दंडाधिकारी एन. के. सिंग यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.