एटीएम आणि बँका दोन दिवस बंद राहणार
पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Nov 8, 2016, 09:02 PM ISTब्रिटनच्या पंतप्रधान घेणार मोदींची भेंट
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. दोन्ही देशातले मैत्रीचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी या दोघांमध्ये चर्चा होईल.
Nov 7, 2016, 09:27 AM ISTस्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांचे फोटो
कोर्ट परिसरात झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटाची चौकशी सुरु झाली आहे. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्या ठिकाणी एक पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्याचे फोटो आढळले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, यामध्ये खुलासा झाला आहे की देशात आणखी काहबी ठिकाणी अशाच प्रकारे स्फोट घडवून आणले जाऊ शकतात.
Nov 3, 2016, 12:30 PM ISTपाकिस्तानला धडा शिकवण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला निर्णय
विनाश काले विपरीत बुद्धी अशी जी म्हण प्रचलीत आहे ती पाकिस्तानच्या बाबतीत खरी ठरते. भारतामध्ये हिंसा पसरवण्याचा पाकिस्तानकडून सतत प्रयत्न होत असतो. शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून सतत उल्लंघन होतं आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या १४ चौक्या उद्धवस्त केल्या.
Nov 3, 2016, 09:24 AM ISTछत्तीसगडमध्ये पंतप्रधानांची फोटोग्राफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2016, 02:38 PM ISTसरदार पटेल कोणाचे कॉपीराईट नाही - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त 'रन फॉर यूनिटी' कार्यक्रमात पोहोचले होते. पंतप्रधानांनी देशाला जोडण्याचं श्रेय सरदार पटेल यांना दिलं. त्यांनीच 'एक भारत'चा नारा दिला होता. सगळ्यांचं स्वप्न आहे की देश मजबूत आणि बलवान झाला पाहिजे. पण त्यासाठी पहिली अट आहे की देशात एकता असावी.
Oct 31, 2016, 07:29 PM ISTशहीद जवानाच्या मुलीने म्हटलं 'आता पंतप्रधान मोदीच आमचे पिता'
पाकिस्तानी सेनेकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार सिंह यांच्या पार्थिवावर शनिवारी अंतिम संस्कार करण्यात आले. पिता शहीद झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी म्हटलं की त्यांचे वडील आता नाही राहिले. आता पंतप्रधान मोदी हेच आमचे पिता असं त्यांनी म्हटलं आहे.
Oct 30, 2016, 08:48 PM ISTअपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींकडे सर्जिकल स्टाईकची मागणी
पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाचं वातावरण आहे. प्रत्येक जण पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचं बोवतंय. यामध्ये आता मुलायम सिंह यादव यांच्या लहान सुनेने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 30, 2016, 06:18 PM ISTपंतप्रधान मोदींसोबत जवानांनी दिल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने जवानांना भेटण्यासाठी गेले आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सोबतच पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.
Oct 30, 2016, 03:26 PM ISTपंतप्रधान मोदींनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यावर्षी दिवाळीचा सण जवानांसोबत साजरा केला. यंदा मोदींनी भारत-चीन सीमेचं रक्षण करणाऱ्या इंडो तिबेटीयन आणि लष्कराच्या डोगरा रेजिमेंटसोबत आपली दिवाळी साजरी केली. पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये जवानांशी संवाद साधला.
Oct 30, 2016, 03:19 PM ISTमोदींची जवानांसोबत दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:49 PM ISTइतिहास असणाऱ्या या गावात पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमाभागात जावून दिवाळी साजरी करतात. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिली दिवाळी ही सियाचीनमधील जवानांसोबत साजरी केली. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी जम्मू-कश्मीरमधील लोकांमध्ये जावून दिवाळी साजरी केली. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील सुदूर सीमाभागात जवानांच्या एका चौकीवर दिवाळी साजरी करणार आहेत.
Oct 29, 2016, 03:23 PM ISTपंतप्रधानांचं जवानांसाठी अभियान, दिवाळीला जवानांना संदेश पाठवण्याचं आवाहन
भारतीय लष्कराने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत जगाला आपलं शौर्य दाखवून दिलं. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अभियान सुरु केलं आहे. पंतप्रधान मोदींनी 'संदेश टू सोल्जर्स' अभियान सुरू केलं आहे. यंदाच्या दिवाळीत तुमचा एक छोटाचा संदेश जवानाच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते.
Oct 23, 2016, 12:10 PM ISTपंतप्रधान मोदींनी या देशाचं नाव घेतल्याने पाकिस्तानात खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा मंडी येथे इस्राईलचं नाव घेतलं तेव्हापासून पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. यामागचं कारण असं की इस्राईल ऐवढे सर्जिकल स्टाईक अजून कोणीच केलेले नाहीत.
Oct 18, 2016, 10:04 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलचे मानलेत आभार
दहशतवादविरोधी लढ्यात देऊ केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलचे आभार मानलेत. गोव्यामध्ये झालेल्या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझिलचे अध्यक्ष मायकल टेमर यांच्याशी मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली.
Oct 18, 2016, 12:19 AM IST