'बहुतेक मी गे आहे..' शाहरुख खान भर कार्यक्रमात असं का म्हणाला? कुणासोबतच लिंक अप रुमर्स समोर आले नाहीत

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा बॉलिवूड किंग खान म्हणून ओळखला जातो. इतके वर्ष करिअरमध्ये असूनही सुपरस्टारचं नाव कधीच कोणत्या अभिनेत्रीसोबत लिंकअप रुमर्सही समोर आलेले नाहीत. यावर शाहरुख खानने दिलेलं उत्तर अतिशय मजेशीर आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 15, 2025, 11:18 AM IST
'बहुतेक मी गे आहे..' शाहरुख खान भर कार्यक्रमात असं का म्हणाला? कुणासोबतच लिंक अप रुमर्स समोर आले नाहीत title=

Shah Rukh Khan On No Link Up Rumours With Any Actress: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं करिअर अतिशय सुंदर आहे. शाहरुख खानने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहे. तसेच अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केलं आहे. मात्र महत्त्वाची बाब ही आहे की, एवढ्या वर्षांचं त्यांचं नाव कधीच कोणत्या अभिनेत्रीसोबत लिंकअप झाल्याच्या रुमर्स समोर आलेले नाहीत. खूप वर्षांपूर्वी एका मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने दिलेलं उत्तर चकीत करणार आहे. 

शाहरुख खानचं नाव कधीच कुणाशी जोडलं गेलं नाही

एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा शाहरुख खानला विचारण्यात आले की,  इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्याचे नाव कोणत्याही अभिनेत्रीशी का जोडले गेले नाही, तेव्हा किंग खानने उत्तर दिले, "मला वाटते की मी समलैंगिक (गे) आहे . प्रत्येकजण मला विचारतो की, माझे नाव का कुणाशी जोडले गेले नाही? हिंदी चित्रपटातील कोणत्याही नायिकेशी संबंध नव्हते का? मला माहित नाही. ते सर्व मित्र आहेत. मी नेहमीच या प्रश्नावर हेच उत्तर देतो. 

मी या लोकांसोबत काम करतो, मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे, आणि मी फक्त या सर्व मुलींसोबत काम करतो... मी त्या सर्वांशी खूप संलग्न आहे... मला त्या सर्वांवर प्रेम आहे आणि मी त्यांच्यासोबत खूप वेळ घालवतो. ते माझ्या घरी येतात, मी त्यांच्या घरी जातो. आम्ही एकमेकांचे फोन घेतो आणि बोलतो. आम्ही एकमेकांना व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या मदत करतो कारण आम्ही एकमेकांना समजून घेतो."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jarp Media (@jarpmedia)

प्रियंकासोबत लिंकअप झालं शाहरुखचं नाव 

2011 मध्ये, शाहरुख आणि प्रियांका चोप्रा यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल अफवा पसरल्या होत्या. डॉनच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची जवळीक वाढली असं म्हटलं जात होतं. नाईट क्लब, पार्ट्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे दोघे वारंवार एकत्र दिसल्याने या अफवांना आणखी उधाण आलं होतं. पण गौरी खानशी विवाहित शाहरुखने प्रियांकासोबतच्या प्रेमसंबंधाच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या आणि स्पष्ट केले होते की, त्यांचे नाते म्हणजे एक चांगली मैत्री आहे. आपल्या पत्नीशी वचनबद्ध राहून, शाहरुखने जाहीरपणे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे अफवांनाही पूर्णविराम मिळाला.