नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त 'रन फॉर यूनिटी' कार्यक्रमात पोहोचले होते. पंतप्रधानांनी देशाला जोडण्याचं श्रेय सरदार पटेल यांना दिलं. त्यांनीच 'एक भारत'चा नारा दिला होता. सगळ्यांचं स्वप्न आहे की देश मजबूत आणि बलवान झाला पाहिजे. पण त्यासाठी पहिली अट आहे की देशात एकता असावी.
पंतप्रधान मोदींनी यावेळेस विरोधी पक्षावर टीका देखील केली. 'सरदार पटेल हे कोणाचे कॉपीराइट नाही आहेत. त्यांच्यावर संपूर्ण देशाचा अधिकार आहे. सरदार पटेल यांनी देशाला जोडण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांचं योगदान विसरता येणार नाही.'
पंतप्रधानांनी या 'लोह पुरुष'ला संसदेत श्रद्धांजली वाहिली. इंडिया गेटवर एका कार्यक्रमात डाक तिकीट देखील जारी केलं. सोबतच 'रन फॉर यूनिटी'ला हिरवा झेंडा दाखवला.
याआधी मोदींनी ट्विट करत म्हटलं की, 'मी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीवर त्यांना नमन करतो. आम्ही भारताला त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची आठवण करतो.'