इतिहास असणाऱ्या या गावात पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमाभागात जावून दिवाळी साजरी करतात. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिली दिवाळी ही सियाचीनमधील जवानांसोबत साजरी केली. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी जम्मू-कश्मीरमधील लोकांमध्ये जावून दिवाळी साजरी केली. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील सुदूर सीमाभागात जवानांच्या एका चौकीवर दिवाळी साजरी करणार आहेत.

Updated: Oct 29, 2016, 03:23 PM IST
इतिहास असणाऱ्या या गावात पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमाभागात जावून दिवाळी साजरी करतात. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिली दिवाळी ही सियाचीनमधील जवानांसोबत साजरी केली. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी जम्मू-कश्मीरमधील लोकांमध्ये जावून दिवाळी साजरी केली. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील सुदूर सीमाभागात जवानांच्या एका चौकीवर दिवाळी साजरी करणार आहेत.

पीएम मोदी जेथे दिवाळी साजरी करणार आहेत त्या गावाला थोडा वेगळा इतिहास आहे. पीएम मोदींनी असंच हे गाव नाही निवडलं. असं म्हणतात की गरीबी संपवण्यासाठी उत्तराखंडमधील या गावात यावं. या गावात जे ही येतात त्यांची गरीबी निघून जाते. पंतप्रधान याच गावात जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित राहणार आहेत. डोवाल उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील एका गावात थांबणार आहेत. या गावाला शापमुक्त गावाचा दर्जा आहे. या गावात येणारा व्यक्ती शापमुक्त होतो असं म्हटलं जातं. 

पवित्र बद्रिनाथ धामपासून 3 किमी अंतरावर भारत आणित तिबेट यांच्या सीमेवर असणाऱ्या या गावाला भगवान शिव यांचा भक्त मणिभद्र देव यांच्या नावाने ओळखलं जातं. माणा गाव हे चमोली जिल्ह्याच्या प्रसिद्ध बद्रिनाथ धामपासून ३ किमी अंतरावर आहे. तेथे जावून पंतप्रधान भगवान बद्रिविशालचं दर्शन देखील घेणार आहेत.