स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांचे फोटो

कोर्ट परिसरात झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटाची चौकशी सुरु झाली आहे. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्या ठिकाणी एक पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्याचे फोटो आढळले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, यामध्ये खुलासा झाला आहे की देशात आणखी काहबी ठिकाणी अशाच प्रकारे स्फोट घडवून आणले जाऊ शकतात.

Updated: Nov 3, 2016, 12:30 PM IST
स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांचे फोटो title=

मलाप्पूरम, तिरूवनंतपुरम : कोर्ट परिसरात झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटाची चौकशी सुरु झाली आहे. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्या ठिकाणी एक पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्याचे फोटो आढळले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, यामध्ये खुलासा झाला आहे की देशात आणखी काहबी ठिकाणी अशाच प्रकारे स्फोट घडवून आणले जाऊ शकतात.

पेन ड्राइव्हच्या सूचनेमधून खुलासा झाला आहे की, स्फोट हे अन्य ठिकाणी केले जाणार होते. काही ठिकाणांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. त्यांना काही कागदं देखील मिळाले आहेत ज्यामध्ये घटनेबाबत काहीतरी लिहिलं आहे.

राज्य सरकारने घटनेच्या चौकशीसाठी एक विशेष टीम तयार केली आहे. केरळमधील ही दुसरी घटना आहे. पहिली घटना जूनमध्ये कोल्लम कलेक्ट्रेटमध्ये घडली होती. येथेही स्फोट झाला होता. त्याठिकाणी देखील काही अशा वस्तू आढळल्या होत्या ज्या आताच्या घटनेशी साम्य दर्शवतात. पेन ड्राइव्हमध्ये पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांचे फोटो आढळल्याने याबाबतीत चौकशी सुरु झाली आहे.