Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या एक महिना उलटून गेलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर बीडसह (Beed Murder Case) राज्यात संतापाची लाट उसळलीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तपास सीआयडी आणि एसआयटीकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केलीय. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत आहे. पण इतकं दिवस तो पोलिसांच्या का हाती लागत नाही. पण बीड कोर्टात आज एसआयटीने कराडबद्दल मोठे खुलासे केले आहेत.
- वाल्मिकनं हत्येच्या दिवशी देशमुखांना धमकी दिली
- वाल्मिकनं हत्येच्या काही तास आधी धमकी दिली होती
- 9 डिसेंबरला 4च्या दरम्यान संतोष देशमुखांचं अपहरण
- दुपारी 3.20 ते 3.40 घुले-चाटे-कराडचा संवाद
- सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिकची फोनवरुन चर्चा
- आरोपीनं कट रचून देशमुखांची हत्या केली
- अधिक तपासासाठी कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी
- हे संघटित गुन्हेगारीचं प्रकरण
- कराडवर मकोका लावावा
- तपासादरम्यान पुरावे मिळालेत
- पुराव्यांची उलट तपासणी करायची आहे
- घटनेतील 1 मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे
- आंधळेला फरार व्हायला कराडनं मदत केली का हे तपासयचंय
- कराडची परदेशात मालमत्ता आहे का तपासायचंय
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य तीन आरोपी पैकी एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे अजून फरार आहे. कृष्णा आंधळेला वाल्मिक मदत करत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. इतर आरोपींना राज्यभरातून शोधून काढणाऱ्या सीआयडीला मात्र अजूनही कृष्णाचा थांगपत्ता लागलेला नाहीय.
महत्त्वाच म्हणजे कृष्णा आंधळेच्या कुटुंबीयांची मित्रांची अगदी जवळच्या सर्वच नातेवाईकांची सीआयडीने चौकशी केली. त्याची आर्थिक नाकेबंदी ही केली. यानंतर तरी कृष्णा शरण येईल असं सीआयडीला वाटत होतं. मात्र पैसे नसतानाही कृष्णा जगतोय कसा याचा शोध सीआयडीला लागले नाही. त्यात वाल्मिकच्या मदतीने कृष्णा राज्याबाहेर तर गेला नाही ना हाच प्रश्न सध्या सीआयडीला सतावतोय आणि वाल्मिकच्या चौकशीत हे सत्य शोधण्याचं मोठा आव्हान आता एसआयटी पुढे असणार आहे.
खरं तर या प्रकरणात काही दिवसांपूर्वीचं पोलिसांनी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दुक्कलीला बेड्या ठोकल्या. बीड पोलिसांच्या विशेष पथकानं पुण्यातून या दोघांना जेरबंद केलं. पण कृष्णा आंधळे काही त्यांच्या हाती लागला नाही. तो थोडक्यात पोलिसांना चकवा देवून पसार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडलंय. कर्नाटकसह दुसऱ्या राज्यात त्याचा शोध घेतला जात आहे.
कृष्णा आंधळेवर 2023 मध्येही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तरी त्याला अटक झाली नव्हती. तो बिनदास्त बाहेरल फिरायचा. मागील चार वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने धारूर, आंबाजोगई, आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारामारी, आणि खुनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
गावकऱ्यांच्या मते, कृष्णा आंधळेची ओळख वाल्मिक कराडच्या विश्वासू विष्णू चाटे याच्याशी झाली. त्यातूनच त्याला राजकीय आणि आर्थिक व्यवहारात काम करण्याचे संधी मिळाल्या. मुकादम, राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे गावकरी सांगतात.