Highest Score in Women ODI Cricket India: भारतीय महिला क्रिकेट संघाने राजकोटमध्ये झालेल्या आयर्लंडविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे. भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. ज्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघाचा समावेश आहे. आयर्लंडविरोधात खेळताना भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 435 धावांचा डोंगर उभा केला. थोडक्यात महिला क्रिकेट संघाने पुरुष क्रिकेट संघालाही मागे टाकलं आहे. भारतीय संघाने 304 धावांनी हा सामना जिंकला.
भारतीय महिला संघाने जो पराक्रम केला आहे, तो पुरुष संघालाही जमलेला नाही. पुरुष किंवा महिला संघाने क्रिकेटमध्ये 2011 मध्ये सर्वोधिक धावसंख्या नोंदवली होती. तेव्हा भारताने संघाने 418/5 धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये महिला संघाचा एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या नावे आहे. हा रेकॉर्ड त्यांनी 2018 मध्ये आयर्लंडविरोधातच केला होता.
भारतीय संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला क्रिकेट संघाने यावेळी आपली सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली तसंच पहिल्यांदा 400 चा आकडाही पार केला. याआधी 12 जानेवारीला महिला संघाने 370 धावा करत सर्वाधिक धावांची नोंद केली होती.
Updates https://t.co/xOe6thhPiL#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DA0X4HUAuB
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत हरमनप्रीत कौरच्या जागी कर्णधारपद भूषवणाऱ्या मंधानाने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावलं. हे तिचं 10 वं शतक आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाकडून सर्वात जलद शतक ठोकण्याचा हरमनप्रीत कौरचा विक्रम स्मृती मंधानाने मोडला. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक शतकं करणारी स्मृती चौथी क्रिकेटपटू ठरली आहे. राजकोट येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात स्मृतीने आयर्लंडविरुद्ध अवघ्या 70 चेंडूत शतक झळकावलं, तिने 80 चेंडूत 135 धावा केल्या, ज्यामध्ये तिने 7 षटकार आणि 12 चौकार ठोकले. यापूर्वी हरमनप्रीत कौरने गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 चेंडूत शतक ठोकून हा विक्रम केला होता.
Updates https://t.co/xOe6thhPiL#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GgwPOGL3Uk
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
2017 पासून हा विक्रम हरमनप्रीतच्या नावे आहे, एकदिवसीय विश्वचषकात डर्बी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 चेंडूत शतक ठोकलं होतं. स्मृतीचे 70 चेंडूत शतक हे महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील संयुक्त सातवे सर्वात जलद शतक आहे. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतकाचा विक्रम मेग लॅनिंगच्या नावावर आहे. तिने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 45 चेंडूत शतक ठोकलं होतं.
स्मृती व्यतिरिक्त, सलामीवीर प्रतिका रावलनेही 129 चेंडूत 154 धावांची शानदार खेळी केली. तिने 20 चौकार आणि 1 षटकार मारला. प्रतिकाचे हे पहिले एकदिवसीय शतक आहे. प्रतीका रावलने आतापर्यंत सहा एकदिवसीय डावांमध्ये 74 च्या सरासरीने 444 धावा केल्या आहेत.
या सामन्यात प्रतिका आणि कर्णधार मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 26.4 षटकांत 233 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिचा घोषनेही 59 धावांची शानदार खेळी केली.