maharashtra news

जेवणात उंदराचे पिल्लू देणाऱ्या मुंबईतल्या 'त्या' रेस्तराँला दणका; बंद करण्याचे आदेश

Mumbai News : मुंबईच्या वांद्रे भागातील प्रसिद्ध 'पापा पांचो दा ढाबा' या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना जेवणाच्या ताटाच उंदराचे पिल्लू देण्यात आले होते. तक्रारदार व्यक्ती त्याच्या मित्रासोबत जेवायला गेला होता ते हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता.

Aug 18, 2023, 03:57 PM IST

महाराष्ट्रात कॅसिनो कायदा अखेर रद्द, गौरी गणपतीसाठी सरकार देणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्तवाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत अखेर महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे. यासोबतच गौरी, गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा नागरिकांना देण्यात येणार आहे.

Aug 18, 2023, 02:19 PM IST

मांजरीच्या मागे लागतो म्हणून मालकिणीने श्वानावर ओतलं अ‍ॅसिड; घटना CCTVत कैद

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे कुत्र्याला एक डोळा गमवावा लागला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 18, 2023, 01:53 PM IST

राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात

MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aug 18, 2023, 01:50 PM IST

रिस्पेक्ट! अ‍ॅम्ब्युलन्सची वाट न पाहता पोलीस हवालदाराने महिलेला उचलून पोहचवलं रुग्णालयात

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून तैनात असलेल्या संदीप वाकचौरे यांनी एका वृद्ध महिलेचा जीव वाचवला आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

Aug 18, 2023, 01:26 PM IST

पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर ते पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे- नागपूर या मार्गावर एमएसआरटीसी लवकरच नॉन-एसी (वातानुकूलित) स्लीपर बस सुरू करणार आहे. 

Aug 18, 2023, 12:04 PM IST

Video : '...तर त्यांना चप्पलने मारा', राष्ट्रवादीच्या आमदाराचा नागरिकांना अधिकाऱ्यांसमोरच अजब सल्ला

Mla Balasaheb Ajabe : सरकारी योजना मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार बाळासाहेब आजबे चांगलेच संतापले होते. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना चप्पलने मारण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

Aug 18, 2023, 12:02 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Aug 18, 2023, 11:18 AM IST

संताप अनावर होताच भाजीवाल्यानं छाटले तरुणाचे दोन्ही हात; कारण हादरवून सोडणारं

Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. क्षुल्लक कारणावरुन एका भाजीविक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Aug 18, 2023, 10:38 AM IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

MTDC Recruitment 2023: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 18, 2023, 09:47 AM IST

मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी; विदर्भाला यलो अलर्ट, कोकणात मात्र चकवा

Maharashtra Weather Updates: राज्यातून मोठ्या सुट्टीवर गेलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा धीम्या गतीनं का असेना पुनरागमनास सुरुवात केली आहे. पाहा हवामान विभागाकडून मिळालेली माहिती

Aug 18, 2023, 07:11 AM IST

MIDC Job: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत नोकरी

MIDC Job: या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. केंद्रावर होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Aug 17, 2023, 06:56 PM IST

देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

Shasan Aaplya Daari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल काही सल्ले दिले. तसंच लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली.  

Aug 17, 2023, 03:22 PM IST

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 

Aug 17, 2023, 09:53 AM IST

Maharashtra Rain : विदर्भाला इशारा देत पाऊस परतलाय; उर्वरित राज्यात काय परिस्थिती?

Maharashtra Rain : दडी मारलेला पाऊस आता राज्याच टप्प्याटप्प्यानं परतताना दिसत आहे. त्यामुळं काही भागांमध्ये शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे. 

 

Aug 17, 2023, 07:22 AM IST