Samantha Ruth Prabhu on Naga Chaitanya : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिची वेब सीरिज 'सिटाडेल: हनी बनी'मुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. समांथा तिच्या कामासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात ती तिचा पूर्वाश्रमीचा नवरा नागा चैतन्यविषयी बोलताना दिसत आहे.
नागा चैतन्य आणि समांथानं बरीचवर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2017 मध्ये लग्न केलं. दोघांनी लग्नाच्या 4 वर्षानंतर ते दोघं विभक्त झाले आणि 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाचं नक्की कारण काय याविषयी कळलं नाही. वरुण धवनसोबत व्हिडीओमध्ये समांथानं नागा चैतन्यला लग्नाच्या वेळी दिलेल्या महागड्या गिफ्ट्सवरून वक्तव्य केलं आहे.
समांथा नुकतीच 'सिटाडेल: हनी बनी' च्या प्रमोशन दरम्यान, वरुण धवनसोबत एका मुलाखत देण्यासाठी पोहोचली होती. त्यावेळी वरुणनं तिला विचारलं की 'तू सगळ्यात जास्त पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च केले. जे पूर्णपणे वाया गेले?' त्यावर क्षणभरही न थांबता समांथानं उत्तर दिलं 'माझ्या पूर्वाश्रमीच्या जोडीदारावर मी भरपूर पैसा उधळला. त्याला मी अनेक महागड्या गोष्टी भेट (गिफ्ट) म्हणून दिलेल्या.' समांथानं दिलेलं हे उत्तर ऐकूण वरुणला आश्चर्य झालं आणि विचारलं की 'किती पैसे?' यावर समांथा थोडावेळ थांबली आणि हसत म्हणाली 'खूप जास्त.' समांथाचा हा व्हिडीओ नागा चैतन्यच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्हायरल झाला. समांथा आणि वरुणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
हेही वाचा : किशोर कुमार कोण? आलियानं रणबीरला विचारलेल्या प्रश्नावरून नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्रीला ट्रोल
दरम्यान, नागा चैतन्य आणि शोभिता पुढच्या महिन्यात सप्तपदी घेणार आहेत. नागा चैतन्यनं त्याच्या लग्नाविषयी बोलताना सांगितलं होतं की तो खूप उत्साही आहे, पण लग्नाची तयारी आणि सगळं काही कसं होणार यावरून थोडी भीती वाटते. ते दोघं 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत.