पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर ते पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे- नागपूर या मार्गावर एमएसआरटीसी लवकरच नॉन-एसी (वातानुकूलित) स्लीपर बस सुरू करणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2023, 12:04 PM IST
पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय title=

MSRTC Sleeper Buses: महाराष्ट्रात होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर ते पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे- नागपूर या मार्गावर एमएसआरटीसी लवकरच नॉन-एसी (वातानुकूलित) स्लीपर बस सुरू करणार आहे. 

अनेक प्रवासी  ट्रेनमध्ये वेटिंग लिस्टवर नाव लागल्यास निराश होतात. यानंतर काही पर्याय नसल्याने त्यांना खासगी बससाठी जास्त पैसे मोजावे लागतात.  खाजगी बस ऑपरेटर्सकडून विशेषत: सणासुदीच्या हंगामात मोठे तिकीट दर आकरले जातात. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसतो. पण आता एसटी महामंडळाच्या या निर्णयाने विशेषत: विद्यार्थी आणि व्यावसायिकांना याचा फायदा होणार असल्याचे गणेशपेठ बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले.
 
बसमध्ये एकूण 45 प्रवासी बसण्याची क्षमता असून त्यातील 15 जागा स्लीपर आणि 30 आसनक्षमतेच्या असतील. नागपूर ते पुणे दुपारी 12 आणि 5 वाजता दोन सेवा सुरू असेल. त्याचप्रमाणे पुणे ते नागपूर मार्गावर दोन बसेस तैनात केल्या जातील ज्या नागपूरच्या दिशेने प्रवासासाठी एकाच वेळी सुटतील. दोन्ही शहरांमधील अंतर 14 तासांत कापले जाईल. बस अमरावती मार्गे सोडली जाईल आणि समृद्धी महामार्गावरुन जाणार नाही, असे शेंडे यांनी सांगितले. 

एमएसआरटीसीने याआधी नागपूर-शिर्डी स्लीपर बससेवा सुरू केली होती, ज्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. बसला पहिला गणेशपेठ बसस्थानक आणि दुसरा नागपूर विमानतळ असे दोनच थांबे होते. नागपूर ते शिर्डी आणि परतीच्या प्रवासात केवळ 3 ते 4 प्रवासी प्रवास करत होते, असे शेंडे यांनी स्पष्ट केले. यामुळे बससेवा तोट्यात चालली होती आणि अखेर MSRTC ला सेवा बंद करावी लागली होती, असेही त्यांनी पुढे सांगितले. 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

MSRTC सध्या नागपूर-पुणे मार्गावर शिवशाही बसेस चालवते पण त्यात स्लीपर सेवा नाही. ज्या मार्गाला मोठी मागणी आहे त्या मार्गावरील प्रवाशांसाठी स्लीपर बस सेवा पर्यायी ठरणार आहे. या प्रवासात एकेरी तिकिटाची किंमत 1,400 रुपये असेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

MIDC Job: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत नोकरी