मुंबईचे तीन शिलेदार IPL मेगा ऑक्शनमध्ये राहिले Unsold, एक तर टीम इंडियाचा माजी कर्णधार

सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ऑक्शनला सुरुवात झाली. यावेळी मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारे तीन खेळाडू ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड  राहिले.  

पुजा पवार | Updated: Nov 25, 2024, 04:30 PM IST
मुंबईचे तीन शिलेदार IPL मेगा ऑक्शनमध्ये राहिले Unsold, एक तर टीम इंडियाचा माजी कर्णधार  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Mega Auction : जगातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शन सुरु आहे. या मेगा ऑक्शनसाठी 577 खेळाडूंनी नाव नोंदवली असून पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंना संघांनी ऑक्शनमधून विकत घेतले. सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ऑक्शनला सुरुवात झाली. यावेळी मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारे तीन खेळाडू ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड  राहिले.  

Unsold राहिले 3 स्टार खेळाडू : 

आयपीएल ऑक्शनचा दुसरा दिवस सुरु झाल्यावर सुरुवातीला टीम इंडियाचा माजी कर्णधार राहिलेला अजिंक्य रहाणे ऑक्शन टेबलवर आला.  आयपीएल 2023 आणि 2024 मध्ये अजिंक्य चेन्नई सुपरकिंग्सचा भाग होता. मात्र त्याला ऑक्शनपूर्वी रिलीज करण्यात आले. तसेच अजिंक्य मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघाचा कर्णधार सुद्धा आहे. अजिंक्यने स्वतःच नाव 1.5  कोटींच्या बेस प्राईजवर नोंदवलं होतं. मात्र त्याकिंमतीवर त्याला संघात घेण्यासाठी कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणे ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसाेल्ड राहिला. टीम इंडियाचा ऑल राउंडर शार्दूल ठाकूर हा सुद्धा आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा भाग होता. मात्र त्याला ऑक्शनपूर्वी रिलीज करण्यात आले. शार्दूलने 2 कोटींच्या बेस प्राईजवर आपलं नाव ऑक्शनसाठी नोंदवलं होतं. मात्र या किंमतीवर शार्दूलला आपल्या संघात घेण्यासाठी कोणतीही बोली लावली नाही त्यामुळे अजिंक्यनंतर मराठमोळा क्रिकेटर शार्दूल सुद्धा आयपीएल ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिला.   

हेही वाचा : घरमे घुसके मारा, चौथ्या दिवशीच कसोटी खिशात, आता कसं असेल WTC फायनलचं गणित?

 

पृथ्वी शॉसाठी एकानेही लावली नाही बोली : 

अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर आणि पृथ्वी शॉ हे तिघेही रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून खेळतात. मात्र अजिंक्य, शार्दूलनंतर पृथ्वी शॉसाठी कोणत्याही फ्रेंचायझीने बॅटल वर केलं नाही. पृथ्वी शॉने ऑक्शनमध्ये स्वतःची बेस प्राईज 75 कोटी ठेवली होती. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, मात्र त्याचा परफॉर्मन्स लागोपाठ घसरत राहिला आणि अखेर मेगा ऑक्शनपूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिलीज केले. आयपीएल ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये पृथ्वी शॉ अनसोल्ड  राहिला.  अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर आणि पृथ्वी शॉ हे तिघेही आयपीएल ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसाेल्ड  राहिले असले तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या राउंडला त्यांच्यावर पुन्हा संघ बोली लावू शकतात.