काय असेल Kalki 2898 ADच्या सीक्वेलमध्ये दीपिका पदुकोणची भुमिका ? चित्रपट निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

deepika padokone in Kalki 2898AD sequel: Kalki 2898 AD या चित्रपटाच्या सिक्वेलचे काम सुरु झाले आहे. अशातचं चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की या चित्रपटात दीपिका पदुकोणची भुमिका काय असणार? 

Updated: Nov 25, 2024, 05:50 PM IST
काय असेल Kalki 2898 ADच्या सीक्वेलमध्ये दीपिका पदुकोणची भुमिका ? चित्रपट निर्मात्यांनी केला मोठा खुलासा  title=

deepika padokone in Kalki 2898AD sequel: प्रभास  आणि दीपिकाचा चित्रपट कल्कि 2898 ए़डीने 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जवळ जवळ 1100 कोटींची कमाई केली. प्रेक्षकांना हा आगळा वेगळा चित्रपट प्रचंड आवडला होता.  चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपट सीक्वेलची घोषणा केली असून सध्या त्यांनी तयारी सुरु केली आहे. चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की, हा चित्रपट 2026 मध्ये सर्वत्रित प्रदर्शित होईल. चाहते सध्या या चित्रपटाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलमधील कलाकारांबाबत एक मोठा खुलासा केलाय. या चित्रपटात दीपिकाची भूमिका काय असणार हे निर्मात्यांनी सांगितले आहे. या चित्रपटात प्रभास, दिशा पटानी,कमल हासन, अमिताभ बच्चन हे कलाकार आहेत.

कशी असणार दीपिकाची भूमिका 

दीपिका पदुकोण सध्या तिच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. परंतु 'कल्कि 2898 ए़डी'च्या सीक्वेल सोबतच प्रसुत रजा संपवून आपले काम सुरु करणार आहे. या चित्रपटाची माहिती देताना निर्माते स्वप्ना दत्त आणि प्रियंका दत्तने गोव्यात झालेल्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव (IFFI) मध्ये सांगितले की दीपिकाने पहिल्या भागात गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती आणि पुढील सिक्वेलमध्ये ती एका आईची भूमिका साकारणार आहे. स्वप्न दत्तने बोलता बोलता असे संगितले आहे कि चित्रपटाच्या काही भागात ती एका आईच्या भूमिकेत असणार आहे. 

या चित्रपटाबद्दल बोलताना प्रियांका दत्त आणि स्वप्ना दत्तने असे सांगितले की, हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे काम सुरु झाले आहे. सध्या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शनचे काम चालू आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागासोबतच या सिक्वेलचा 30-35 भाग पहिलेच शूट झाला आहे. निर्मात्यांनी असे सांगितले आहे की, या चित्रपटाचे पुढील शूटिंग फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुरु होईल. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार यासंदर्भात निर्मात्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाहीये.  हा चित्रपट सुद्धा एका मोठ्या पातळीवर बनवला जातोय. या दुसऱ्या भागात कमल हासन खलनायाकाच्या भुमिकेत असणार आहे.