देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

Shasan Aaplya Daari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल काही सल्ले दिले. तसंच लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली.  

Pravin Dabholkar | Updated: Aug 17, 2023, 03:23 PM IST
देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी title=

CM Ajit Pawar On Papoulation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल काही सल्ले दिले. तसंच लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली.  

तुम्हाला विनंती आहे. रस्ते चांगले केले ते गाड्या वेगाने पळवण्यासाठी केले नाहीत. पण अनेक वाहनचालक जोराने गाड्या पळवतात. अशाने टायर फुटणे आणि अपघातांचे प्रकार समोर येतात. समृद्धी महामार्ग चांगला प्रकल्प आहे. तो बदनाम होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत लोकसंख्या वाढीवर भाष्य केले. एक किंवा दोन अपत्यावर थांबा. कारण जगात आपण एक किंवा दोन नंबर पोहोचलो आहोत. लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनलाही मागे टाकलंय, असे अजित पवारांनी सांगितले. 

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

अरे बाबांनो, जमिन आहे तेवढीच आहे. मुळा आणि भंडारदारा यापेक्षा धरणं बांधता येत नाही. साईटच शिल्लक नाही..करायचं काय? असा प्रश्न त्यांनी विचारला.

देवाची कृपा..देवाची कृपा..कसली देवाची कृपा? नवऱ्याची कृपा असते. आपण जरा व्यवहारी वागलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी

बीडमध्ये उत्तर सभा 

शरद पवारांची बीडमध्ये सभा होणार आहे. शरद पवारांची सभा पार पडल्यानंतर 27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभा घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर उत्तर सभेचं धनंजय मुंडे यांच्यावतीने अयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या सभेवरून राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे.