www.24taas.com,इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नसला तरी चुलत बहिण फातिमा भुट्टो ही निवडणूक लढण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची पुतणी फातिमा आहे. पाकमध्ये ती लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे. फातिमा भुट्टो देशात होणा-या आगामी निवडणुकामध्ये पंजाब प्रांतातून लढणार आहे. तशी माहिती तिची सावत्र आई घिनवा भुट्टो यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानमधील प्रसारमाध्यांनी दिले आहे.
फातिमा पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील लियाकतपूर येथून निवडणूक लढवणार आहे. फातिमा हिचे वय ३० वर्ष आहे. तिने वडिलांच्या जीवनावर सॉग्ज ऑफ ब्लड एण्ड सॉर्ड हे पुस्तक लिहले आहे.
या पुस्तकातून त्यांनी पाकिस्तान पिपल्स पार्टी आणि राजकारणाबरोबरच भुट्टो आणि झरदारी घराण्यातील वंशवादी परंपरेवर जोरदार हल्ला केला होता. त्यामुळे राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पाकमध्ये निवडणूक लढविण्यास २५ वर्षांची अट आहे.