पालिका निवडणुकीत प्रस्थापितांचे गड शाबुत
नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात प्रस्थापितांनी आपले गड राखलेत. सांगली जिल्ह्यात इस्लामपूरमध्ये ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी 23 जागा जिंकत विरोधकांना दणका दिलाय.
Dec 15, 2011, 03:31 AM ISTमनसेचा ऐतिहासिक विजय, खेड पालिका काबीज!
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत पहिल्यांदाच मनसेनं मिळवली सत्ता मिळवली आहे. राज्यात पहिली नगरपालिका ताब्यात घेण्यात मनसेला यश आले आहे. मनसेने ९, शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना प्रत्येकी १ जागावर मिळाला विजय मिळविला आहे.
Dec 12, 2011, 08:54 AM ISTचंद्रपूरमध्ये दोन नगरपालिकांमध्ये मतदान
चंद्रपूर नगरपालिकांतील दोन नगरपालिकांच्या मतदानास सुरूवात झालीय. राजुरा व मल या नगरपालिका क्षेत्रात मतदान होत आहे. परिसरात थंडी असल्यानं सकाळी संथगतीने मतदानास सुरुवात झालीय.
Dec 11, 2011, 07:47 AM ISTबार्शीत मतदानाला गर्दी
सोलापुरातल्या बार्शीत मतदानास सुरूवात झालीय. सुट्टीचा दिवस असल्यानं मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी केलीय. बार्शीत अंदाचे पावणे दोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे.
Dec 11, 2011, 07:42 AM ISTजुन्नरमध्ये मतदान
जुन्नर नगरपालिकेतल्या १७ जागासांठी मतदानला सुरुवात झालीय. इंथराष्ट्रवादीविरोधशिवसेना,RPI आणिभाजपअशी थेट लढतआहे. तर काही ठिकाणी मनसेची युती पाहायला मिळतेय.मतदारांचा मात्र थंड प्रतिसाद पहायला मिळतोय.
Dec 11, 2011, 07:38 AM ISTरत्नागिरीत मतदान
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी मतदानास सुरूवात झालीय. चार नगरपालिका आणि १ नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे.एकून १०३ नगरपालिकांच्या जागांसाठी मतदान होत असून ३८२ उमेदावार रिंगणात आहेत.
Dec 11, 2011, 07:30 AM ISTराष्ट्रवादीची नवी भूमिका गुंडगिरी नको
गुंडगुरी करणारे लोक राजकारणात नको ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. ज्या पक्षात असे लोक असतील त्यांचा जनतेनं खुशाल पराभव करावा असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केलयं.
Dec 8, 2011, 06:47 AM ISTराज ठाकरे परीक्षेबाबत समाधानी
"परीक्षेसाठी अभ्यास करुन उमेदवारांनी प्रमाणिकपणे परीक्षा दिली" या गोष्टीचं मला खूप समाधान वाटतंय, या शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी झालेल्या परीक्षेबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Dec 5, 2011, 06:33 AM ISTअशोक चव्हाण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
नांदेडमध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार असा संघर्ष सुरू झालाय. निवडणुकीच्या प्रक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या दबावाखाली होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Dec 5, 2011, 03:33 AM ISTमनसे झाली लेखी परीक्षा, आता निकालाची प्रतिक्षा!
आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे इच्छुकांची आज परीक्षा झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड अशा सहा शहरांमध्ये ही परीक्षा झाली. एकून 3156 इच्छुकांनी ही परीक्षा दिली.
Dec 4, 2011, 03:35 PM ISTअजित पवारांचा उद्घाटनांचा धडाका
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये उदघाटनांचा धडाका लावलाय. अजितदादांनी आज शहरात तब्बल दहापेक्षा जास्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं.
Dec 3, 2011, 04:15 PM ISTभटके मतदार कसे - राज ठाकरे
मुंबईतील भटके मतदार कसे होऊ शकतात. त्यांची नावे मतदार यादीत नकोत, असे राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगताच आपल्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.
Dec 2, 2011, 08:11 AM ISTपनवेल निवडणुकीत यंदा मनसेही
पनवेल नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा मनसेही उतरणार आहे. नगरपरिषदेच्या आखाड्यात मनसे पहिल्यांदाच उतरणार असल्यानं सत्ताधाऱ्यांना आणखी एक वेगळं आव्हान असणार आहे.
Nov 24, 2011, 03:55 PM ISTइजिप्तमध्ये २०१२मध्ये निवडणूक!
इजिप्तमध्ये लोकशाही बदलाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या मागणीनंतर येत्या जुलै २०१२मध्ये निवडणुका घेण्यात येतील, असे इजिप्तच्या सत्ताधीशांनी जाहीर केले आहे.
Nov 23, 2011, 09:36 AM ISTमुलाची हूल, निवडणुकीतून गूल; म्हणे, 'डॉक्टरचीच भूल'!
महेंद्र दुधे निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारीही सुरू केली होती. मात्र तिसरं अपत्य झाल्यानं त्यांची गोची झाली, तेव्हा तिसऱ्या अपत्याचं खापर त्यांनी चक्क डॉक्टरवरच फोडलंय.
Nov 23, 2011, 07:59 AM IST