www.24taas.com,मुंबई
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतील निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीवरुनही वाद झालाय. साडेचार हजारांपेक्षा अधिक मतदान झालंच कसं ? असा सवाल नटराज पॅनलचे विनय आपटे यांनी केलाय.
मुंबईतील सुमारे अडीच हजार मतदारांना मतपत्रिका मिळाल्या नसल्याती तक्रार त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केलीये. मग एव्हढं मतदान झालं कस ? असा सवाल विनय आपटे यांनी केलाय. दरम्यान आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकाल १९ तारखेला सायंकाळपर्यंत हाती येणे अपेक्षित आहे.
मुंबई विभागाच्या निवडणुकीत १६ जागांसाठी५८ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण मतदारांची संख्या ६०४९ आहे. मोहन जोशींचे उस्फूर्त पॅनल, विनय आपटे यांचे नटराज पॅनल आणि प्रमोद पवार यांची तिसरी आघाडी अशी तिहेरी लढत अध्यक्षपदासाठी आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, मतपत्रिका गहाळ होणे अशा अनेक घटनांमुळे नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अधिकच चर्चेत आलीय. त्यामुळे आता कोणतं पॅनल या निवडणूकीत निवडून येईल? कोणत्या पॅनलला किती मतं पडतील? याकडं नाट्यवर्तुळाचं आणि प्रेक्षकांचं लक्ष लागलंय.