www.24taas.com,मुंबई
अखिल भारतीय नाट्य़ परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था पाहिल्यास, एखाद्या राजकीय निवडणुकीलाही लाजवेल असा कडेकोट पोलीस बंदोबस्त या परिसरात लागू करण्यात आलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यानं अनेक पोलिसांना या परिसरात तैनात केलय.
अखिल भारतीय नाट्य़ परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. नाट्य परिषदेच्या सोळा जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत विक्रमी तब्बल साडेपाच हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. त्यामुळं विजयाचं दान कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता लागलीये.
दादरच्या यशवंत संकुलात ही मतमोजणी होतेय. १० बुथवर ४०कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. मोहन जोशींचे उस्फूर्त पॅनल, विनय आपटे यांचे नटराज पॅनल आणि प्रमोद पवार यांची तिसरी आघाडी, प्रदीप कबरे यांचे स्वतंत्र पॅनल अशी लढत अध्यक्षपदासाठी आहे.
मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था पाहिल्यास, एखाद्या राजकीय निवडणुकीलाही लाजवेल असा कडेकोट पोलीस बंदोबस्त या परिसरात लागू करण्यात आलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यानं अनेक पोलिसांना या परिसरात तैनात केलाय.
शिवाय मतमोजणी केंद्रावरच्या हालचाली टिपण्य़ासाठी १२ सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आलेत. कोणतीही अनुचित घटना घ़डू नये यासाठी हा बंदोबस्त असल्याचं सांगण्यात येतयं. शिवाय मध्य़ेच वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन जनरेटरही ठेवण्य़ात आलाय़.