`आप`च्याही पिंपळाला पानं तिनंच!; इथंही गटबाजी?
आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखविण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसंही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.
Feb 16, 2014, 11:52 PM IST`त्या` बेकायदेशीत गर्भपाताबद्दल डॉ. गोरे अडचणीत
नाशिकमध्ये अनधिकृतपणे गर्भपातप्रकरणी शासकीय अधिकारी असलेले डॉ. गोरे आता अडचणीत आलेत. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतलीय. असं असलं तरी अद्याप कारवाई होत नसल्यानं व्हिजिलन्स कमीटीही बुचकळ्यात पडलीय.
Feb 8, 2014, 09:14 AM ISTतिच्या हिमतीनं गुन्हा उघड, पण कारवाई...
लिंगनिदान आणि गर्भपात याबाबत राज्य शासनानं कठोर पाऊल उचललं मात्र तरीही नाशिक शहरात अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याच समोर आलंय. गर्भपात करण्यात आलेल्या महिलेनंच याबाबत तक्रार केल्यानं हा प्रकार समोर आला आहे. याबाबत नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी डॉक्टरला अटक का केली नाही याबाबत शंका आहे.
Feb 7, 2014, 12:54 PM ISTनाशिकमध्ये २०६० भूतबंगले
नाशिकमध्ये तब्बल २०६० घरं गरीबांसाठी बांधून तयार आहेत. पण कुणाचंच लक्ष या घरांकडे नाही. त्यामुळे या घरांचे अक्षरशः भूतबंगले झाले आहेत.
Feb 4, 2014, 09:31 PM ISTनाशकात झोपी गेलेली मनसे झाली जागी
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतशी सत्तधारी पक्षातील मंडळी लोकाभिमुख योजना राबविण्याच्या घोषणा करताना दिसतायेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हाच ट्रेंड दिसून येतोय. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या मनसेनं नाशिक शहाराकडे लक्ष केंद्रित केलंय. गेल्या आठ दिवसांत शहरात घोषणा आणि विकास कामांचा धडाका सुरु करून नाशिककरांच्या नाशिककरांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
Jan 30, 2014, 05:49 PM ISTवाय-फाय नाशिक; मनसेची नवी घोषणा!
तरुणाईची नस पकडत नाशिकमध्ये मनसे कामाला लागलीय. मनसेची नवी घोषणा आहे `वाय-फाय नाशिक`....
Jan 30, 2014, 11:12 AM ISTराज ठाकरेंनी तंबी देताच ते लागलेत चक्क कामाला
नाशिक महानगर पालिकेच्या कारभाराबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी कामाला लागलेत. रोजच्या बैठका आणि पाहाणी दौरे करून नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायला सुरूवात केलीय.
Jan 26, 2014, 05:18 PM ISTमृत्यूंजय : अवघ्या २८व्या वर्षी पचवल्या आठ बायपास!
वय वाढलं की, साधारणपणे हृदयरोगाचा धोकाही वाढतो, मग बायपास सर्जरी करावी लागते... परंतु, नाशिकच्या एका तरूणावर २८ व्या वर्षीच बायपास सर्जरी करावी लागलीय. तीदेखील तब्बल आठ वेळा... एवढ्या बायपास सर्जरी करणारा हा नाशिककर कदाचित जगातील सर्वांत तरूण पेशंट असावा.
Jan 24, 2014, 05:55 PM ISTनाशिकनंतर राज ठाकरेंचा मोर्चा पुण्याकडे....
मनसेच्या नाशिकमधील नगरसेवकांची मुंबईत झाडाझडती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये येणार आहेत.
Jan 22, 2014, 09:34 AM ISTराज ठाकरेंकडून महापौर यतीन वाघ यांची खरडपट्टी
नाशिक महापालिकेत सत्तेची दोन वर्ष पूर्ण केलेल्या महापौर आणि मनसे नगरसेवकांच्या कामांचं ऑ़डिट पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत केलं. कृष्णकुंजवर घेतलेल्या बैठकीत महापौर यतीन वाघ यांची राज ठाकरेंनी चांगलीच खरडपट्टी काढली.
Jan 21, 2014, 10:48 PM IST<b><font color=red>धक्कादायकः</font></b> शाळेमध्ये चक्क दारुड्यांचा अड्डा, कॅमऱ्यात कैद
आता एक धक्कादायक बातमी नाशिकमधून... नाशिक महापालिकेच्या शिक्षणाविषयीच्या उदासीन धोरणामुळे महापालिकेच्या स्थापनेपासून ३५ शाळा बंद पडल्याचा स्पेशल रिपोर्ट झी मीडियानं चार दिवसांपूर्वी दाखवली होती...
Jan 21, 2014, 09:08 PM ISTनाशकात उभारणार शिवसेनाप्रमुखांचं मंदिर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींचं जतन व्हावं, यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आता मंदिर उभारणारेत. हे मंदिर केवळ त्यांचंच नसून शिवमंदिरात या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
Jan 20, 2014, 11:00 AM ISTमनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना जामीन
मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना नाशिकमध्ये सातपूर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना गुरूवारी जामीन मिळाल्याने त्यांची सुटका झाली आहे.
Jan 17, 2014, 08:02 AM ISTमनसे प्रदेश सरचिटणीस यांना अटक
मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना नाशिकमध्ये सातपूर पोलिसांनी अटक केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या पोस्टरबाजी प्रकरणी चांडक यांना अटक करण्यात आली आहे.
Jan 16, 2014, 10:56 AM ISTफसवणुकीचा फटका... बँकेचीच तिजोरी रिकामी
नाशिकच्या प्रथितयश आणि आर्थिक संपन्न असलेल्या नामको बँकेच्या संचालकांची मनमानी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला खरा मात्र नाशिकारांनी धसका घेत सर्व बँकेतील रकमा काढून डबघाईला आणली आहे.
Jan 12, 2014, 10:44 PM IST