नाशिकमध्ये हॉटेलमध्ये मारामारी, तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात हॉटेलमालकाचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये बुधवारी रात्री दारु पिऊन एका गटानं गोंधळ घातला. त्यात एकाच मृत्यू झालाय.
Mar 27, 2014, 01:30 PM ISTगारपिटीनं लालेलाल डाळिंब कुजले... सडले
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंबांना मोठा फटका बसलाय. गारपिटीच्या तडाख्यानं डाळीबांना तडे गेल्यानं ते फेकून देण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आलीय.
Mar 15, 2014, 04:12 PM ISTभुजबळांच्या ट्रस्टची चौकशी करून कारवाई करा - हायकोर्ट
बांधकाममंत्री छगन भुजबळ संचालक असलेल्या, नाशिक येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवहाराची मुंबई उच्च न्या़यालयानं दखल घेतलीये. याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांची शिक्षण शुल्क कमिटीने चौकशी करुन नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश मंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
Mar 14, 2014, 08:34 PM ISTनाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार, तरूण ठार
नाशिकच्या पंचवटी भागात झालेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात ठार झालेल्या युवकाचं नाव प्रवीण हांडे असं आहे.
Mar 10, 2014, 11:27 AM ISTसलग चौथ्या दिवशीही राज्यात गारांचा कहर
महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीटीनं विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र थैमान घातलंय. गारपीटीमुळे बीडमध्ये तीन जणांचा बळी घेतला तर २० जण जखणी झालेय. तर जळगावमध्ये गारपीटीनं एकाचा बळी घेतलाय.
Mar 8, 2014, 10:37 PM ISTशिवसेना तरी हेमंत गोडसेंना विजय मिळवून देणार?
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेन हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यानं गेल्या आठ दिवसांपासूनची शिवसैनिकांमधली संभ्रमावस्था थांबलीय. मनसेच्या उमेदवाराचं नाव अद्याप गुलदस्त्यात असल्यानं एकाच ‘राज’ बाकी मैदानात अशी काहीशी परिस्थितीत नाशिक मतदार संघाची झालीय. गोडसे यांचा थेट सामना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि मनसेच्या उमेदवाराविरोधात होणार असल्यानं निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे.
Mar 7, 2014, 08:51 PM ISTमहाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट...
हिवाळ्याच्या दिवसांत पावसानं आणि गारपीटीनं अख्या महाराष्ट्राची भांबेरी उडालीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडल्यानं शेतकरी डोक्यावर हात मारून बसलेत. गेल्या कित्येक दिवसांची त्यांची मेहनत या गारपिटीनं अवघ्या काही तासांत चिखलात बुडवलीय.
Mar 6, 2014, 04:02 PM ISTभुजबळांच्या उमेदवारीला विरोध, मनमाडमध्ये रास्तारोको
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. आज येवला बंदची हाक देण्यात आलीये. मनमाड-नगर रस्त्यावर रास्तारोको करण्यात आलाय. भुजबळांच्या उमेदवारीला विरोध होतोय.
Mar 1, 2014, 03:49 PM ISTछगन भुजबळांचा शरद पवारांनी केला गेम!
नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी त्यांचा गेम केल्याची खमंग चर्चा रंगलीय. अनेक दिग्गज मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असं आधी पवारांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात एकट्या भुजबळांनाच लोकसभेवर पाठवून पुतणे अजित पवारांचं वर्चस्व वाढवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे की काय, असं बोललं जातंय. त्यामुळं भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय.
Mar 1, 2014, 11:13 AM ISTनाशिकमध्ये सलमान, सुनील शेट्टीची बोट सफर
आगामी लोकसभा निवडणुका एका एक दिवस जवळ येत असल्यानं भूमिपूजन आणि उद्घाटनांची मालिकाच सध्या सुरु आहे.
Feb 25, 2014, 11:14 PM ISTउत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान
नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Feb 25, 2014, 12:25 PM ISTदहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले
संकेत आणि मुज्जफर. शनिवारी सकाळी दहावीच्या निरोप समारंभसाठी आनंदात संकेत आणि मुझफ्फर निघाले. हसतखेळत जात असताना त्रिमूर्ती चौकात त्यांना एका मोपेडचा धक्का लागला. ट्रकखाली चिरडलं गेल्यानं दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलीस चौकी असूनही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी कधीही पोलीस नसतात. दरम्यान, परभणीतील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला.
Feb 23, 2014, 06:39 PM ISTराज ठाकरे-नितीन गडकरींनी केले एकमेकांचे कौतुक
नाशिकमधल्या गोदापार्कच्या भूमिपूजनात राज ठाकरे आणि नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं.
Feb 22, 2014, 03:39 PM ISTनितिन गडकरी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर
नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागणारे राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आज नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
Feb 22, 2014, 12:58 PM ISTपुणे-नाशिक महामार्गावर अपघात, ७ ठार
पुणे महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास बोटा शिवारात ट्रक आणि बोलेरो पिक-अपमध्ये भीषण अपघातात ७ जण मृत्युमुखी पडले तर ९ जण जख्मी झाले आहेत. मृतांत ३ लहान मुलांचा समावेश आहे.
Feb 17, 2014, 03:13 PM IST