www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या महापौरांनी स्वच्छता निरीक्षकाच्या चक्क थोबाडीत मारलीय. ३ दिवस कचरा उचलला जात नव्हता, त्याचा राग येऊन महापौर यतीन वाघ यांनी स्वच्छता निरीक्षक शंतनु बोरसे यांच्या थोबाडीत मारलीय.
महापौरांच्या प्रभागात येणाऱ्या सराफ बाजारातला कचरा उचलण्यासाठी महापौर गेले दोन दिवस घंटागाडी कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. मात्र अनेकदा सांगूनही घंटागाडीच्या ठेकेदारांनी कचरा उचलला नाही. आज या परिसरांत दुर्गंधी पसरली. नागरिकांच्या तक्रारींनंतर महापौर घटनास्थळी पोहचले. त्यानंतर महापौरांनी उपस्थित घंटागाडी कर्मचाऱ्यांना हा कचरा उचलण्यास सांगितलं. तरीही पूर्व आणि पश्चिम विभागाच्या ठेकेदारांनी हद्दीचा वाद घालत हा कचरा उचलण्यास नकार दिला.
घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणामुळं शांत स्वभावाचे महापौर वाघ एकदम खळ्ळफट्टॅकच्या मुडमध्ये आले आणि त्यांनी थेट स्वच्छता निरीक्षक शंतनू बोरसेच्या कानफटात लगावली, असं त्यांचं म्हणणं आहे.
मात्र महापौरांनी आपण कुठलीही मारहाण केली नसल्याचं सांगितलं असून आपल्या विरुध्द हे कारस्थान असल्याचा त्यांनी आरोप केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.