Champions Trophy 2025 :जवळपास 8 वर्षानंतर आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून याकरता बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद हे रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेला संघ हा 6 फेब्रुवारी पासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये देखील खेळेल.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापत ग्रस्त असल्याने मोहम्मद शमी हा जवळपास 14 महिने टीम इंडियाचा भाग नव्हता. मात्र आता तो पूर्णपणे फिट झाला असून त्याला पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलंय. मोहम्मद शमीला 22 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजसाठी देखील टीम इंडियाचं भाग बनवण्यात आलंय.
2017 नंतर आयसीसी यंदा प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत असून ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल पद्धतीने खेळवली जाईल. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद असून दुबईत भारताचे सर्व सामने खेळवले जातील. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार असून 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. तर भारताचा पहिला सामना हा 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध खेळवला जाईल. भारताचा शेवटचा लीग सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार असून ग्रुप ए मध्ये भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये अफगानिस्तान, इंग्लंड , दक्षिण अफ्रीका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 15 सामने खेळवले जातील.
20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश
23 फेब्रुवारी : रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान
2 मार्च : रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड
रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा
राखीव : हर्षित राणा