www.24taas.com , झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये देवळाली लष्करी कॅम्पमध्ये प्रादेशिक सेनेच्या भरती प्रक्रियेवेळी नाशिक शहरात विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी झालीय.
६ राज्यांतून ४० हजार विद्यार्थी आलेले असताना रेल्वे स्टेशन ते आर्टिलरी कँम्पमध्ये त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. नियोजन पूर्णत: ढासळल्यानं ही घटना पहाटेच्या वेळी घडलीय.
रात्रभर सुरू असलेला पाऊस, तसंच खाण्यापिण्याची कुठलीही व्यवस्था यावेळी नव्हती, अशा अवस्थेतच मुलाखती आयोजित केल्या गेल्या. रात्रभर या विद्यार्थ्यांसाठी साधी पाण्याचीही सोय नव्हती. त्यामुळं या भरती प्रक्रियेतून बेरोजगारांच्या संतापाचा उद्रेकच पाहायला मिळाला.
सध्या देशात बेरोजगारांची संख्या खूप आहे. नोकरीच्या शोधात बेरोजगार युवक-युवती भटकत आहेत. त्यामुळंच की काय लष्करी कॅम्पमध्ये प्रादेशिक सेनेच्या भरती प्रक्रियेत इतकी गर्दी झाली का? हे देश प्रेम आहे की बेरोजगारीचा परिणाम असा सवाल यामुळं उपस्थित होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.