ट्रकने उडालेला दगडाने घेतला टॅक्सीतील प्रवाशाचा जीव
मुंबई - पुणे महामार्गावर कामोठे ते तुर्भे दरम्यान रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान, रस्त्यावर अनेक दगड पडलेले असून रस्त्यावरील एक दगड ट्रकने उडाल्याने चालत्या टॅक्सीवरील काचेवर आदळला. दगडाने काच तुटली आणि टॅक्सीतील प्रवाशाला लागला. या अपघातात प्रवाशी जागीच ठार झाला.
Mar 15, 2014, 10:55 PM ISTठाणे, नवी मुंबईसाठी `क्लस्टर डेव्हलपमेंट` मंजूर
राज्य सरकारने मुंबईतील 2000 सालापर्यंत झोपड्यांना सरकारनं संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे धोकादायक इमारतींचा विकास करणे शक्य होणार आहे. तसेच ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत क्लस्टर डेव्हलपमेंटलाही मंजुरी मिळाली आहे.
Feb 28, 2014, 11:06 PM ISTमुंबई-उपनगरांत अवकाळी पावसाची हजेरी
वीकएन्डला मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय. मुंबई आणि उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आहे. बोरिवली, मालाड, वसई-विरार, भाईंदर, डहाणू तालुक्यातल्या बोर्डी परिसरातही पावसानं हजेरी लावलीय.
Feb 15, 2014, 12:52 PM ISTमुंबईसह उपनरांत पावसाच्या सरी
मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या शहर भागातल्या परळ वरळीसह वांद्रे आणि बोरिवली भागात पावसाच्या सरी कोसळल्या.
Feb 14, 2014, 08:31 AM ISTचूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय
राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय.
Jan 27, 2014, 03:16 PM ISTराज इशाऱ्यानंतर टोल नाक्याचं खळ्ळ खट्याक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा टोलविरोधी आक्रमक भूमिका घेतलीय. टोल नाक्यावर टोल भरू नका, कोणी आडवे आले तर फोडून काढा असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यानंतर लगेच याची अंमलबजावणी केली आणि ऐरोलीतील टोल नाक्याची तोडफोड केली गेली.
Jan 26, 2014, 10:10 PM ISTआम्ही गांडू नाहीत, 'दादा'गिरी चालणार नाही - राज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईत गरजलेत. त्यांनी राज्य सरकारला टार्गेट केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. अजित पवार आम्ही गांडू नाहीत. तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.
Jan 26, 2014, 09:13 PM ISTलग्नास नकार दिल्याने प्रेयसीची हत्या
नवी मुंबईत दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर लग्नासाठी मागे लागलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची गळा चिरुन हत्या केलीय.
Jan 7, 2014, 01:25 PM ISTआता भारतातही आवाजावर चालणारा कम्प्युटर!
आजच्या कम्युटरच्या जगात कोणाच्या डोक्यात कोणती कल्पना सुचेल याचा नेम नाही... महत्वाचं म्हणजे आजची पिढी फक्त कल्पना सुचव गप्प बसत नाही… तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही प्रयत्न करते… असाच एक आगळा-वेगळा प्रयत्न केलाय नवी मुंबईतल्या स्वप्नील देसाईनं...
Dec 19, 2013, 12:33 PM ISTसंध्या सिंह हत्याप्रकरणी मुलगा रघुवीर सिंहला अटक
नवी मुंबईतल्या संध्या सिंह हत्याप्रकरणी पहिली अटक झालीय. संध्याचा मुलगा रघुवीर सिंग पोलिसांना शरण येताच त्याला अटक करण्यात आलीय.
Dec 16, 2013, 10:05 PM ISTहुंडाबळी: शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून रुपालीची आत्महत्या
हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.
Dec 15, 2013, 10:06 PM ISTकोकणचा विकास कुठं? शरद पवारांचा सरकारला घरचा आहेर
निसर्गानं दोन्ही हातानं सौंदर्य बहाल केलेल्या कोकणाचा हवा तसा विकास झालेला नाही.. कोकणचा पर्यटन विकास होणं गरजेचं असून त्यासाठी महामार्ग आणि जलमार्गाचाही विकास होणं महत्वाचं असलंयाचं म्हणत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला घरचाच आहेर दिलाय...
Dec 14, 2013, 10:36 PM ISTनवी मुंबईत दरोडा, पिस्तुल रोखून दीड किलो सोने लुटले
नवी मुंबईत पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. जुईनगरमधील विशाल ज्वेलर्सवर मंगळवारी रात्री दरोडा पडला, दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवत दीड किलो सोने पळवून नेले. पाच दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर सोने घेऊन पोबारा केला.
Dec 4, 2013, 05:06 PM ISTअसे कसे बनवतात रस्ते? पाईपलाईन पुन्हा फुटली
नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, डोंबिवली, दिवा आणि मुंब्रा या शहरांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
Nov 12, 2013, 05:24 PM ISTसोने, पैसे नव्हे तर नवी मुंबईत चक्क कांद्याची चोरी
सध्या पेट्रोलपेक्षा कांद्याला भाव आलाय. कांद्याचा भाव गगनाला गेल्याने चक्क चोरांनी सोने, पैसे याकडे दुर्लक्ष करून चक्क कांद्यावर डल्ला मारने सुरू केलेल. अशीच एक घटना नवी मुंबईत उघडकीस आली.
Nov 9, 2013, 08:08 PM IST