ट्रकने उडालेला दगडाने घेतला टॅक्सीतील प्रवाशाचा जीव

मुंबई - पुणे महामार्गावर कामोठे ते तुर्भे दरम्यान रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान, रस्त्यावर अनेक दगड पडलेले असून रस्त्यावरील एक दगड ट्रकने उडाल्याने चालत्या टॅक्सीवरील काचेवर आदळला. दगडाने काच तुटली आणि टॅक्सीतील प्रवाशाला लागला. या अपघातात प्रवाशी जागीच ठार झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 16, 2014, 08:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
मुंबई - पुणे महामार्गावर कामोठे ते तुर्भे दरम्यान रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान, रस्त्यावर अनेक दगड पडलेले असून रस्त्यावरील एक दगड ट्रकने उडाल्याने चालत्या टॅक्सीवरील काचेवर आदळला. दगडाने काच तुटली आणि टॅक्सीतील प्रवाशाला लागला. या अपघातात प्रवाशी जागीच ठार झाला.

जुईनगर येथे रस्त्यावरील दगड ट्रक खाली आला. मुंबईहून खारघरच्या दिशेने जाणाऱ्या टॅक्सीवर फेकला गेला., या दगडाची तीव्रता एवढी होती की टॅक्सीची काच तोडून दगड पाठी बसलेल्या प्रवाशाच्या डोक्यात पडला. यातच प्रवाशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

कल्पेश सिंग हा व्यापारी गुरुवारी रात्री मुंबईहून टॅक्सी करून खारघर येथे आपल्या घरी परतत होते. यावेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक खाली रस्त्यावरील दगड आला. तो दगड ट्रक्सीतील प्रवाशी कल्पेश सिग यांच्या डोक्यावर लागला. टॅक्सी चालकाने तत्काळ रुग्नालयात कल्पेश यांना दाखल केले. मात्र, त्याआधीच कल्पेशच्या जीवावर हा दगड बेतला.

याप्रकरणी घरच्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. कंत्राटदाराने रस्त्यावर आलेले दगड उचलले नसल्याने ही दुर्घटना घडल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.