www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य सरकारने मुंबईतील 2000 सालापर्यंत झोपड्यांना सरकारनं संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय.
या निर्णयामुळे धोकादायक इमारतींचा विकास करणे शक्य होणार आहे.
तसेच ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत क्लस्टर डेव्हलपमेंटलाही मंजुरी मिळाली आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासी तसेच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना याचा फायदा असल्याचं सांगण्यात येतंय.
तसेच निर्णयामुळे मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी मदत होईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीचं म्हटलं आहे.
नुकतीच सरकारने यापूर्वी मुंबईतील १९९५ च्या आधीच्या झोपड्यांचं हस्तांतरणाला परवानगी दिलीय. त्यामुळे १-१-१९९५ पर्यंत आणि त्यापूर्वीपासून अस्तित्त्वात असणाऱ्या झोपडीत प्रत्यक्ष राहत असलेल्या झोपडीधारकास याचा फायदा होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.