नवी मुंबई

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, एक अटकेत

लग्नाचं आमिष दाखवून २५ वर्षीय युवतीवर वर्षभर बलात्कार करणा-या व्हिडीओकॉन कंपनीच्या उच्चपदस्थ कर्मचा-याला कल्याणमध्ये अटक करण्यात आलीय. सुधीर बनसोडे असं या कर्मचा-याचं नाव आहे.

Feb 3, 2012, 12:20 PM IST

नवी मुंबईत हुंडाबळी

हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या ऐरोलीत घडली आहे. पूनम कौर असं या महिलेचं नाव आहे.

Jan 26, 2012, 09:24 PM IST

रमाकांत आचरेकरांचा नवी मुंबईत गौरव

नवी मुंबईतील क्रीडा संकुलातर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा सोहळा सचिन तेंडुलकरचे गुरु रमकांत आचरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रमाकांत आचरेकर यांना सन्मानचिन्ह आणि पाच लाख ५५ हजार गौरव निधी देऊन गौरवण्यात आलं.

Jan 20, 2012, 04:57 PM IST

सिडकोचा डाव, एकीकडे आश्वासन, दुसरीकडून घाव!

नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या तात्पुरत्या घरांवरुन सिडकोनं दुटप्पी भुमिका घेतली आहे. गरजेपोटी बांधलेली ही घरं नियमित करण्यासाठी सिडकोनं एकीकडे हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे याच घरांना पाडण्याच्या नोटीसाही देण्यात आल्या आहेत.

Jan 12, 2012, 05:18 PM IST

स्कूलबसच्या चाकाखाली विद्यार्थी जखमी

नवी मुंबईत स्कुलबसच्या चाकाखाली येऊन पाचवीत शिकणारा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ड्रायव्हरनं हेल्पर नसतांना स्कूल बस मागे घेतल्यानं हा अपघात घडला.

Jan 11, 2012, 09:23 PM IST

आजचा दिवस अपघातांचा

आज दिवसभरात राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. नवी मुंबईतील नेरुळ इथे ट्रक,टँकर आणि ओम्नीच्या विचित्र अपघातात एका दाम्प्त्याचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य पुण्याचे असल्याचं वृत्त आहे.

Jan 1, 2012, 09:35 PM IST

परदेशी नोकरी देणारा भामटा गजाआड

परदेशात नोकरीचं अमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या महाठकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मोहंम्मद रफिक मोहंम्मद असं या महाठकाचं नाव आहे.

Jan 1, 2012, 03:52 PM IST

ज्येष्ठ कवियत्री वंदना विटणकर यांचे निधन

ज्येष्ठ कवियत्री, बालसाहित्यकार आणि बालनाट्याच्या निर्मात्या वंदना विटणकर यांचे दीर्घ आजाराने निधन झालं, त्या ७० वर्षांच्या होत्या. संगीतकार श्रीकांत ठाकरे, गायक मोहम्मद रफी आणि गीतकार वंदन विटणकर या त्र्यीच्या गाण्यांनी मराठी संगीतात अढळ स्थान प्राप्त केलं आहे.

Dec 31, 2011, 06:53 PM IST

नवी मुंबईत 'चौपाटी महोत्सव'

नवी मुंबई 'पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीनं नवी मुंबईत चौपाटी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. महोत्सवात सांस्कृतिक महोत्सवासह खाद्यपदार्थांची रेलचेल आहे.

Dec 26, 2011, 08:02 AM IST

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महिला शिक्षिकांची मारहाण

नवी मुंबईत मनसेच्या कार्यंकर्त्यांनी दयानंद अंग्लोवैदीक महाविद्यालयात तोडफोड केली आहे. यावेळी मनसैनिकांनी मुख्याध्यापकांच्या तोंडाला काळेही फासले. शाळेतील शिक्षक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्की झाली.

Dec 14, 2011, 12:45 PM IST

नवी मुंबईत कंपनीला लागली आग

नवी मुंबईतल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हीव्हीएस या साबण बनवण्याच्या कंपनीला रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणली असली तरी आगीमुळं कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

Dec 13, 2011, 08:06 AM IST

'विघ्नहर सोसायटी'वर विघ्न

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील विघ्नहर इमारतीचं अनधिकृत बांधकाम करुन फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रत्यक्ष मंजूर आराखड्यापेक्षा २० ते ४० टक्के बांधकाम करण्यात आलंय.

Dec 8, 2011, 02:58 AM IST

SIES कॉलेजमध्ये रॅगिंग

नवी मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्याचं उघड झालं. कॉलेज प्रशासनानं याबाबत जास्त बोलण्यास नकार दिला. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना शोधून कारवाई करणार असल्याचं म्हटलं.

Nov 29, 2011, 05:59 AM IST

सीसीटीव्हीने होणार प्रत्येक चौक चौकस !

नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरातल्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.या सुरक्षा व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

Nov 22, 2011, 01:52 PM IST

साचले रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग....

नवी मुंबई शहरात मंगळवारी सगळ्याच रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले होते. कारण कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या वाहनचालकांना वेतन वेळेवर मिळावं या मागणीसाठी त्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता पण त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना बसला.

Nov 16, 2011, 02:42 PM IST