नवी मुंबई

एपीएमसी FSI घोटाळ्याचे गौडबंगाल काय?

 मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याला स्थगिती देण्यात आली आहे. जर घोटाळा झाल्याचा निष्कर्ष पणन संचालकांनी काढला होता तर मग मंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती देण्यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Jun 27, 2014, 08:11 PM IST

एपीएमसी संचालक बरखास्तीला पणनमंत्र्यांची स्थगिती

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची 138.10 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी समितीचे (एपीएमसी) संचालक मंडळ गुरुवारी पणन संचालकांनी बरखास्त केले होते. या बरखास्तीला पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  स्थगिती दिली आहे. या घोटाळ्यात मंत्री शशिकांत शिंदे यांचेही नाव होते. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात होता. आता या बरखास्तिला स्थगिती मिळाल्याने प्रशासक नेमण्याचे संकट टळले आहे.

Jun 27, 2014, 04:20 PM IST

घोटाळा : मुंबई कृषी उत्पन्न समिती संचालक मंडळ बरखास्त

 मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलय. एफएसआय घोटाळा करुन 138.10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आलाय. 

Jun 26, 2014, 08:22 PM IST

पावसाची दडी, भाज्या महागल्यात

 पावसानं दडी मारल्यानं त्याचे परिणाम भाजीच्या दरांवर होत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा भाज्यांचे दर १० टक्क्यांनी वाढलेत. सध्या नवी मुंबईच्या वाशीमधल्या घाऊक भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक नेहमीप्रमाणे होत असली तरी भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा १० टक्क्यांनी वाढलेत. 

Jun 25, 2014, 05:55 PM IST

सानपाड्यात इंग्रजी शाळेत मॉन्टेसरीतील मुलीला अमानुष मारहाण

सानपाडा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मॉन्टेसरीत शिकत असलेल्या मुलीला जोरदार मारहाण करण्यात आली. आयुषी प्रवीण पाटील हिच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुना होत्या. तिच्या मानेवर, हाताच्या दंडावर आणि पाठ देखील मारहाणमुळं लालेलाल झाली होती.

Jun 24, 2014, 08:49 PM IST

नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू

नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू झालाय. कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये ही घटना घडलीये. तलावात बुडालेली तीनही मुले १० ते १२ वर्ष वयोगटातील आहेत.

Jun 14, 2014, 07:49 AM IST

मूकबधिर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नवी मुंबईतील कोपरखैरणेजवळ नकोडे येथे एका मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

Apr 18, 2014, 12:42 PM IST

वाशी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विजयी, पालघर पालिकेकडे लक्ष

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्रमांक 48 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी रमेश शिंदे यांचा दविजय झाला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शिंदे यांचा 290 मतांनी पराभव केला. तर पालघर नगरपरिषदेसाठी आज 74 टक्के मतदान झालं.

Mar 23, 2014, 11:41 PM IST

दोनदा मतदानाबाबत शरद पवार यांची सारवासारव

गावाकडे मतदान केल्यानंतर शाई पुसून मुंबईतही करा मतदान, दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला खरा. मात्र हा सल्ला त्यांच्या अंगाशी आल्यानंतर लगेच सावरासावर केली. दरम्यान टीकेनंतर पवारांनी आपल्या विधानावर सारवासारव केलेय. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेय.

Mar 23, 2014, 07:40 PM IST

बोटावरची शाई पुसा, दोनदा मतदान करा- पवारांचा सल्ला

दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला शरद पवारांनी दिलाय. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. "आधी साताऱ्याला मतदान करा नंतर मुंबईत येऊन मतदान करा", असा धक्कादायक सल्ला पवारांनी दिलाय. बोटाची शाई पुसायला विसरु नका, असंही पवार म्हणाले.

Mar 23, 2014, 03:30 PM IST