सानपाड्यात इंग्रजी शाळेत मॉन्टेसरीतील मुलीला अमानुष मारहाण

सानपाडा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मॉन्टेसरीत शिकत असलेल्या मुलीला जोरदार मारहाण करण्यात आली. आयुषी प्रवीण पाटील हिच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुना होत्या. तिच्या मानेवर, हाताच्या दंडावर आणि पाठ देखील मारहाणमुळं लालेलाल झाली होती.

Updated: Jun 24, 2014, 08:57 PM IST
सानपाड्यात इंग्रजी शाळेत मॉन्टेसरीतील मुलीला अमानुष मारहाण title=

नवी मुंबई : सानपाडा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मॉन्टेसरीत शिकत असलेल्या मुलीला जोरदार मारहाण करण्यात आली. आयुषी प्रवीण पाटील हिच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुना होत्या. तिच्या मानेवर, हाताच्या दंडावर आणि पाठ देखील मारहाणीमुळे लालेलाल झाली होती.

एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा प्रकार घडला असून मुलीच्या आईला जोरदार धक्का बसला आहे. दरम्यान, मुलीला कोणी मारले याबाबत कोणीही काहीही सांगण्यास तयार नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, काल दुपारी आयुषी शाळेत गेली असता घरी ती पडून जखमी झाल्याचा तिच्या पालकांना फोन आला. दुपारी तीन वाजता आयुषीची शाळा सुटत असल्यानं तिची आई शिल्पा पाटील या शाळेबाहेरच तिची वाट पाहात होती. आयुषीला किरकोळ लागलं असावं असं तिच्या आईला वाटले. परंतु प्रत्यक्षात जोरदार मारहाण झाल्याची खात्री पडताच तिला धक्का बसला. 

आयुषीला अमानूष मारहाण झाल्याचा संशय शिल्पा पाटील यांना आला. त्यांनी त्याचवेळेस वर्गशिक्षकाला विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाही. त्यामुळं मुलीच्या आईनं थेट मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली. त्यांना ठोस उत्तर न मिळाल्याने त्या संतप्त झाल्यात. त्यांनी  तुर्भे पोलीस ठाण्यात शाळेविरोधात तक्रार दाखल केली.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.