घोटाळा : मुंबई कृषी उत्पन्न समिती संचालक मंडळ बरखास्त

 मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलय. एफएसआय घोटाळा करुन 138.10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Jun 26, 2014, 11:20 PM IST
घोटाळा : मुंबई कृषी उत्पन्न  समिती संचालक मंडळ बरखास्त title=

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलय. एफएसआय घोटाळा करुन 138.10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आलाय. 

पणन संचालकांनी हा निर्णय घेतलाय. राज्याचे जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्या सह संचालक मंडळातल्या सर्व सदस्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि  मुंबई कृषी उत्पन्न समितीमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी आपला यात काहीही हात नसल्याचे म्हटले आहे. मी यात दोषी नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याने नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न समिती चर्चेत आली आहे. तर राष्ट्रवादीचे मंत्री असल्याने हा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.