बोटावरची शाई पुसा, दोनदा मतदान करा- पवारांचा सल्ला

दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला शरद पवारांनी दिलाय. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. "आधी साताऱ्याला मतदान करा नंतर मुंबईत येऊन मतदान करा", असा धक्कादायक सल्ला पवारांनी दिलाय. बोटाची शाई पुसायला विसरु नका, असंही पवार म्हणाले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 23, 2014, 03:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला शरद पवारांनी दिलाय. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. "आधी साताऱ्याला मतदान करा नंतर मुंबईत येऊन मतदान करा", असा धक्कादायक सल्ला पवारांनी दिलाय. बोटाची शाई पुसायला विसरु नका, असंही पवार म्हणाले.
एका राजकीय पक्षाचा अध्यक्षच असं बेजबाबदारपणाचं विधान करतो, यावर आश्चर्य व्यक्त होतंय. पवारांच्या या विधानाचं राजकीय क्षेत्रात पडसाद उमटू लागलेत. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार याकडं अनेकांचं लक्ष लागलंय.
तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते-पाटील यांनीही मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात अशीच मुक्ताफळं उधळली होती. १७ तारखेला मावळमध्ये आणि २४ तारखेला मुंबईत मतदान करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं.
बोटावरची शाई कशी पुसायची हे तुम्हाला ठाऊक आहेच, असा धक्कादायक सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता आणि त्यानंतर सावरासावरही केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.