अजित पवार

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पवार काका-पुतणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मराठवाड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Jun 2, 2015, 12:37 PM IST

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज अजित पवारांची होणार चौकशी

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्ती असल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता हजर रहावं लागलं. आता सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहावं लागणार आहे. 

May 21, 2015, 03:01 PM IST

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना समन्स

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना पुन्हा समन्स पाठवण्यात आलं आहे, एसीबीने चौकशीसाठी अजित पवार यांना समन्स पाठवला आहे, यामुळे अजित पवार सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

May 19, 2015, 01:00 PM IST

राज्य सहकारी बँक गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवारांची होणार चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी होणार आहे. राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. 

May 16, 2015, 09:53 PM IST

राणेंना वांद्रेची निवडणूक न लढण्याची विनंती केली होती : पवार

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढायला नको होती. मी त्यांना तसा सल्लाही दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज सांगितले. 

Apr 18, 2015, 04:57 PM IST

दादांना 'सोमेश्वर' पावला, पॅनेलचा 21 पैकी 16 जागांवर विजय

साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या सोमेश्वस सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सोमेश्वर विकास पॅनलचा सोळा जागांवर विजय झालाय. तर विरोधी सोमेश्वर जनशक्ती पॅनलचे प्रमुख उमेदवार सतीश काकडेंना पराभव पत्करावा लागलाय. 

Apr 17, 2015, 04:29 PM IST

'सोमेश्वर'च्या निवडणुकीत पवार गटाची आघाडी

'सोमेश्वर'च्या निवडणुकीत पवार गटाची आघाडी

Apr 17, 2015, 03:13 PM IST