दादांना 'सोमेश्वर' पावला, पॅनेलचा 21 पैकी 16 जागांवर विजय

साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या सोमेश्वस सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सोमेश्वर विकास पॅनलचा सोळा जागांवर विजय झालाय. तर विरोधी सोमेश्वर जनशक्ती पॅनलचे प्रमुख उमेदवार सतीश काकडेंना पराभव पत्करावा लागलाय. 

Updated: Apr 17, 2015, 10:36 PM IST
दादांना 'सोमेश्वर' पावला, पॅनेलचा 21 पैकी 16 जागांवर विजय title=

बारामती: साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या सोमेश्वस सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सोमेश्वर विकास पॅनलचा सोळा जागांवर विजय झालाय. तर विरोधी सोमेश्वर जनशक्ती पॅनलचे प्रमुख उमेदवार सतीश काकडेंना पराभव पत्करावा लागलाय. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांना विरोधकांनी पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळं सोमेश्वसची निवडणूक अजित पवारांनी मोठ्या प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळं या निवडणुकीच्या निकालांबाबत प्रचंड उत्सुकता होती. 

पवारांची या कारखान्यावर सलग बावीस वर्षे असलेली सत्ता उलथवून टाकण्यासाठी पवार विरोधक एकत्र आलेत. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, चंद्रराव तावरे अशा मातब्बरांनी या निवडणुकीसाठी सभा घेतल्या होत्या. 

अजितदादांना आव्हान देणारे सतीश काकडे पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. अजितदादांच्या पॅनलला आव्हान देण्यासाठी सतीश काकडेंच्या नेतृत्वात शेतकरी कृती समिती नावाचं पॅनल उभं करण्यात आलं होतं. त्याला विजय शिवतारेंचा पाठिंबा आहे. मात्र त्यांचा पराभव झाला आहे.
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.