सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज अजित पवारांची होणार चौकशी

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्ती असल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता हजर रहावं लागलं. आता सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहावं लागणार आहे. 

Updated: May 21, 2015, 03:01 PM IST
सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज अजित पवारांची होणार चौकशी title=

नवी दिल्ली: महाराष्ट्र सदन घोटाळा आणि उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्ती असल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता हजर रहावं लागलं. आता सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहावं लागणार आहे. 

कारण चौकशी करता उपस्थित राहावं अशी नोटीसच लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं अजित पवार यांना पाठवलीय. आज अजित पवार लाचलूचपत प्रतिबंधक समोर चौकशी करता हजर राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलीय. 

मुंबईतील वरळी इथल्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात अजित पवार चौकशी करता येणार असल्याचं बोललं जातंय. तर याआधी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस मिळताच अजित पवार हे राज्याबाहेर आहेत, असं तोंडी स्वरुपात अजित पवार यांच्याकडून लाचलूचपत विभागाला सांगण्यात आलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.