IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: टी-20 फॉर्मेटमधून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्ती घेतली आहे. मात्र तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. 2024 च्या आयपीएलपूर्वी रोहित शर्मा मुंबई सोडणार अशा अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान पुन्हा एकदा 2025 च्या आयपीएलपूर्वीही अशा या चर्चा समोर येताना दिसतायत. आता असं सांगण्यात येतंय की, मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो.
आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता अजून एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला बाजूला करत हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होतं. त्यानंतररोहित शर्मा 2025 IPL मधील फ्रँचायझी सोडू शकतो अशा बातम्या जोर धरू लागल्या होत्या. अशातच 'दैनिक जागरण'च्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सला अलविदा म्हणू शकतो.
याशिवा तर रोहित शर्मा मुंबई सोडून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनू शकतो, असंही या अहवालात सांगण्यात आलंय. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव बाबतंही या अहवालात नमूद करण्यात आलंय की, तोही मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याची शक्यता आहे.
कर्णधारपदावरून रोहित शर्माची हकालपट्टी झाल्याने रोहित शर्मा नाखूश झाल्या असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या मॅनेमजमेंटच्या या निर्णयाने चाहते अजिबात खूश नव्हते. पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवायला नको होतं, असे चाहत्यांना वाटत होते. रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबईची कमान सांभाळण्यास सुरुवात केली आणि 2023 पर्यंत तो कर्णधारपदी कायम राहिला. या काळात मुंबईने रोहितच्या नेतृत्वाखाली 5 विजेतेपदं जिंकली आहेत. दरम्यान रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.