आग्र्यातील संगमरवरी ताजमहलसमोरच शाहजहाँला बनवायचा होता काळा ताजमहल? जाणून घ्या काय सत्य

Black Taj Mahal Truth : शहाजहांला खरंच संगमरवरी ताजमहाल समोरच बनवायचा होता काळा ताजमहाल? 

दिक्षा पाटील | Updated: Jan 27, 2025, 05:25 PM IST
आग्र्यातील संगमरवरी ताजमहलसमोरच शाहजहाँला बनवायचा होता काळा ताजमहल? जाणून घ्या काय सत्य title=
(Photo Credit : Social Media)

Black Taj Mahal Truth : आपल्या सगळ्यांना माहित आहे की ताज महाल हा White Marble नं बनवण्यात आला आहे. त्याच्या सुंदरतेमुळे संपूर्ण जगात त्याची चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येन लोकं ताज महाल पाहायला जातात. प्रेमाच्या या प्रतिकाला कधी ना कधी पाहावं अशी अनेकांची इच्छा असते. इतकंच नाही तर पहिल्याच नजरेत ताज महालला पाहून सगळेच त्याच्या प्रेमात पडतात. आता विचार करा जर हाच ताज महाल काळ्या मार्बलचा अर्थात Black Marble चा असता तर? तो सगळ्यांना आवडला असता का? त्यातही चर्चा तर ही आहे की शाहजहांला काळ्या रंगाचा ताज महाल बनवायचा होता. पण यात किती सत्य आहे हे कोणालाही माहित नाही. याविषयी इतिहासकारक काय म्हणतात ते जाणून घेऊया.

ताज महाल पाहण्यासाठी भारतात फिरायला आलेल्या पर्यटकांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की शाहजहांला यमुना नदीच्या त्या बाजुला काळ्या रंगाचा ताज महाल बांधायचा होता. तर पर्यटकांना तिथले गाईड देखील याविषयी सांगताना दिसतात. असं म्हटलं जातं की सध्या जिथे मेहताब बाग आहे. तिथे शाहजहांला काळा ताज महाल बांधायचा होता. तिथे आजही काळे मार्बल पाहायला मिळतात. तर हे काळे मार्बल हे ताज महाल बनवण्यासाठी आणलेल्या बांधकाचा एक भाग आहे. 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, एका ताज महालमध्ये तर शहाजहांची बेगम मुमताजची कब्र बनवण्यात आली आहे. तर काळ्या ताज महालममध्ये त्याला स्वत: चा मकबरा बनवायचा होता. पण शाहजहांचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही. कारण त्याचा मुलगा औरंगजेबसोबत असलेले त्याचे मतभेद आहेत. औरंगजेबनं शाहजहांला नजरबंद करण्यात आलं. याचा उल्लेख हा यूरोपचे लेखक जेन-बॅप्टाइज टेवरनियरनं केला होता. तो 1665 मध्ये आग्रामध्ये गेला होता. त्यासोबत एका लेखात असं म्हटलं की ताज महालच्या समोर काळा ताज महाल त्याच्या सावलीचा एक भाग म्हणून राहिल. 

हेही वाचा : असा कोरियोग्राफर ज्याच्या कुटुंबातील 7 सदस्य हिंदू अन् 'तो' एकटाच ख्रिश्चन! तिनदा झालंय लग्न

लोकप्रिय इतिहासकारका राज किशोर शर्मा यावर असं म्हणणं आहे की इतिहासाच्या कोणत्याही प्रमाणित पुस्तकात काळ्या ताज महालचा उल्लेख नाही आहे. काही भारत फिरायला आलेल्या युरोपच्या प्रवाशांनी या कल्पनेचा उल्लेख केला. त्यांचं म्हणणं आहे की इतिहासाला आणखी जाणून घेण्या इतकं आणि परदेशातील पर्यटकांना इथे बोलावण्यासाठी याविषयी सांगण्यात आलं आहे.