Zee 24 Taas Udyog Sammelan: झी 24 तासच्या उद्योग संमेलनात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आमदार मंगलप्रभात लोढा,मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. या मान्यवरांच्याहस्ते विविध उद्योजकांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी राज्य सरकार कौशल्य विकाससाठी कसे काम करतंय? भविष्यात आमच्या विभागाच्या काय योजना आहेत? याबद्दल माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात रोजगार आहे. अनेक मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना माणसांची गरज असते. पण महाराष्ट्रातील लोकांना किती नोकऱ्या मिळतात? हे महत्वाचे आहे. कामगारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. महाराष्ट्र ही आपली भूमी आहे. त्यामुळे इथले व्यवसाय सुजलाम सुफलामा करायचे असल्याचे, महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी महत्वाच्या विषयांवर भाष्य केले.
2014 मध्ये मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा पहिल्यांदा कौशल्य विभाग सुरु केला. तुम्ही पंतप्रधान नसता आणि कोणते मंत्री असता तर कोणता विभाग घ्यायला तुम्हाला आवडलं असतं? असा प्रश्न त्यांना विचारला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कौशल्य विकास विभाग हे नाव सांगितलं. हा विभाग महाराष्ट्र, देशाचे भविष्य आहे. सारेजण एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारला हातभार लावावा, असे आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलंय.
मुंबईच्याजवळ 100 एकर जमिन इनोव्हेशनसाठी घेतली आहे. वर्ल्ड बॅंकने यासाठी 250 कोटी दिले आहेत. या बजेटमध्ये मोठी तरतूद यासाठी होईल. सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत पण ते राज्याबाहेर जातात. यासाठी स्टार्टअप नेक्स्ट डोअर संकल्पना सुरु करणार आहेत. यामुळे आपल्या स्टार्टअपची संख्या 1 लाखांच्यावर जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना आपण सुरु केली. यातील जास्त लोकांनी सरकारी योजनेत नोकरी मिळाल्या. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचा लाभ 2 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी केले. आम्ही प्रत्येक एमआयडीसीत रोजगार मेळा करतोय. आपल्याकडील आयटीआयमध्ये उद्योगपतींचा सहभाग वाढवणार आहोत. महाराष्ट्रातील तरुण-तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. वर्ष संपेपर्यंत 5 लाख जणांना रोजगार देणार असल्याचे लोढा यावेळी म्हणाले.