Vinod Kambli : विनोद कांबळीच्या दुसऱ्या बायकोने 2023 मध्ये घटस्फोटासाठी केला होता अर्ज; पण ती म्हणाली, 'मी माझ्या मित्रालाही...'

Andrea Hewitt on Vinod Kambli : गेल्या काही महिन्यांपासून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी चर्चेत आहे. वानखेडे मैदानाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विनोद पहिल्यांदा त्याचा बायकोला घेऊन आला होता. आता त्याची पत्नी अँड्रिया हिने पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल वक्तव्य केलं.

नेहा चौधरी | Updated: Jan 27, 2025, 05:43 PM IST
Vinod Kambli : विनोद कांबळीच्या दुसऱ्या बायकोने 2023 मध्ये घटस्फोटासाठी केला होता अर्ज; पण ती म्हणाली, 'मी माझ्या मित्रालाही...' title=

Andrea Hewitt on Vinod Kambli : माजी क्रिकेटर विनोद कांबळीने (Vinod Kambli) गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. कधी त्याचा प्रकृतीमुळे तर कधी सचिन तेंडुलकरसोबतच्या भेटीमुळे तो चर्चेत असतो. चाहत्यांना त्याचा आयुष्याबद्दल जाणून घेण्यात खूप रस आहे. नुकताच वानखेडे मैदानाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विनोद कांबळी आणि त्याची दुसरी पत्नी अँड्रिया हेविटही (Andrea Hewitt) आले होते. पहिल्यांद विनोद कांबळीची बायको समोर आल्यामुळे चाहत्यांचा भुवया उंचावल्यात. अनेक कार्यक्रमात आणि सोशल मीडियावरील विनोद कांबळीचा अकाऊंटवर बायकोचे फोटो दिसत नव्हते. अशात पहिल्या पत्नीनंतर दुसऱ्या पत्नीनेही त्याला घटस्फोट दिला अशी चर्चा रंगली होती. आता खुद्द अँड्रिया हेविटने आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितलंय. (Vinod Kambli second wife filed for divorce in 2023 but she said I also want my friend )

गेल्या अनेक वर्षांमध्ये कांबळीच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिला मिळाले. पत्नी अँड्रियाने सांगितलं की, त्यांनी 2023 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. एवढंच नाही तर ती कांबळीला सोडून घरातून निघून गेली होती. पण त्यांचा घटस्फोट झालेला नाही. सुर्यांशी पांडेला दिलेल्या मुलाखतीत अँड्रियाने घटस्फोटाचा निर्णय का बदलला याबद्दल सांगितलंय. 

सुर्यांशी पांडे यांनी अँड्रियाला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना अँड्रिया म्हणाला की, 'मी कोणत्याही मित्रालाही संकटात सोडणार नाही, तो तर माझ्यासाठी माझ्या मित्रांपेक्षाही अधिक आहे. मी त्याला सोडू शकत नाही. तो मला आता आमच्या मुलांसारखाच आहे. त्याला त्रासात पाहून मला त्रास होतो.' ती पुढे म्हणाली की, मी निघून गेले होते. पण माझ्या मनात विचार यायला लागले की तो कसा असेल, त्याने काही खाल्लं असेल का, तो आरामात झोपू शकला असेल का? मी जेव्हा परत आले तर, तेव्हा त्याची परिस्थिती पाहून मी समजून गेले की त्याला माझी गरज आहे.'

त्यानंतर सुर्यांशी पांडेने विचारलं की, कांबळी जवळपास 14 रिहॅबमध्ये जाऊ आला आहे. अशा वेळी सर्व गोष्टी तू कशा सांभाळल्या. त्यावर तिचं उत्तर होतं की, त्यावेळी मला स्वत:लाच खूप गोष्टी समजवाव्या लागल्या की मला मुलांसाठी आई-वडिलांची भूमिका निभवायची आहे. त्यावेळी माझ्या मुलाने मला खूप साथ दिली आणि ते लवकर परिपक्व झाले.

या मुलाखतीत कांबळेचा मुलगा ख्रिस्तियानोही आला होता. तो म्हणाला की, साधारण 4-6 वर्षांचा असल्यापासून सर्व गोष्टी पाहत असल्याने त्याला लवकर गोष्टी समजलं होतं. त्यामुळे तो आईला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आई-बाबांच्या औषधांचीही काळजी घ्यायचा.